अहमदनगर : नगरसेवकांना मिळेना ‘स्वेच्छा’ निधी

तिजोरीत खडखडाट, नगरसेवक हतबल, १० कोटी रुपयांच्या निधीची गरज
Ahmednagar Municipal Corporation
Ahmednagar Municipal CorporationSakal

अहमदनगर : महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद असूनही ५० पेक्षा अधिक नगरसेवकांना त्यांचा वॉर्ड विकास आणि स्वेच्छा निधी वापरता आलेला नाही. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने या निधीतील कामांची बिले काढण्यास प्रशासन टाळाटाळ करते. परिणामी या निधीतून खतवलेली कामे करण्यास ठेकेदार स्पष्ट नकार देत आहेत.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवक स्वेच्छा निधीसाठी सहा कोटी ७० लाख रूपये, तर वॉर्ड विकास निधीसाठी तीन कोटी ४० लाख रूपयांची तरतूद आहे; परंतु ही तरतूद केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप नगरसेवक करत आहेत.

या निधीतून मोजक्याच नगरसेवकांच्या प्रभागात कामे झालेली आहेत. निवडणूक होऊन अडीच वर्षे उलटली, तरी देखील हा निधी वापरता न आल्याने प्रभागातील विकासकामांवर त्याचा परिणाम झाला आहे. शासकीय योजनांमधून सुरू असलेली काही कामे वगळता इतर विकासकामे प्रभागांमध्ये दिसत नाहीत. नगरसेवकांनी वेळोवेळी या दोन्ही निधीची मागणी केली. सर्वसाधारण सभेत वारंवार या विषयावर चर्चा झाली. आयुक्तांना देखील निवेदने देण्यात आली; परंतु अद्याप हा निधी नगरसेवकांच्या पदरात पडलेला नाही. एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी मिळाला, तरी एका प्रभागासाठी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होतो. त्यातून रस्ता, सामाजिक भवन, उद्यान, लहान- मोठी ड्रेनेज व गटारची कामे असे विकासकाम उभे राहते; परंतू हा निधीच मिळत नसल्याने नगरसेवकांसह नागरिकही हतबल झाले आहेत.

एकूण प्रभाग - १७

एकूण नगरसेवक - ६८

स्वीकृत नगरसेवक - ५

स्वेच्छा निधी - ६ कोटी ७० लाख

वॉर्ड निधी - ३ कोटी ४० लाख

शासकीय योजनांमधील कामांना पसंती

दलित वस्ती सुधार योजना, खासदार- आमदारांच्या निधीतील कामे, नगरोत्थान, अमृत यासारख्या शासकीय योजनांमधून मंजूर असलेली कामे करण्यास ठेकेदार लगेच तयार होतात. कारण या कामांची बिले त्यांना लगेच मिळतात. महानगरपालिकेडे वॉर्ड विकास आणि नगरसेवक स्वेच्छा निधी उपलब्ध नसल्याने या निधीतील कामांची बिले ठेकेदारांना मिळत नाहीत. त्यामुळेच शासकीय योजनांमधील कामांना ठेकेदार पसंती देतात.

नगरसेवकांना वॉर्ड विकास आणि नगरसेवक स्वेच्छा निधी मिळालेला नाही. यासंदर्भात आयुक्तांना वेळोवेळी निवेदने दिली. महासभेतही या प्रश्नावर चर्चा झाली. तरी देखील नगरसेवकांना निधी मिळालेला नाही. प्रभागात जास्तीत जास्त कामे व्हावीत, यासाठी प्रत्येक नगरसेवक प्रयत्न करतो. आमचा निधी आम्हाला न मिळाल्यास पुढील महासभा चालू देणार नाही.

- संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते

वॉर्ड विकास आणि नगरसेवक स्वेच्छा निधीसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे या निधीतून काही कामे झाली असून त्यांची बिले ठेकेदारांना देण्यात आली आहेत. निधी उपलब्ध नसल्यास बिले देण्यास उशीर थोडा होतो.

- शंकर गोरे, आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com