Ahmednagar Crime News : राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाखांचा अपहार; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Crime News : राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाखांचा अपहार; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar Crime News : राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाखांचा अपहार; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी : राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेत सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार अठ्याहत्तर रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणुक करुन अपहार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. 14) संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, कर्मचारी व तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व आरोपी फरार आहेत.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

कारभारी बापुसाहेब फाटक (व्यवस्थापक, रा. टाकळीमियाँ), भाऊसाहेब तुकाराम येवले (चेअरमन, रा. राहुरी), शरद लक्ष्मण निमसे (व्हाईस चेअरमन, रा.सह्याद्री नर्सरी, अस्तगांव, ता. राहाता), सुनिल नारायण भोंगळ (लेखनिक तथा वसुली अधिकारी तथा दैनिक बचत प्रतिनिधी, रा. जोगेश्वरी आखाडा), उत्तम दत्तात्रेय तारडे (लेखनिक तथा कॉम्प्युटर ऑपरेटर, रा. केंदळ बुद्रुक), सुरेखा संदीप सांगळे (लेखनिक तथा कॅशिअर, रा. राहुरी), सुरेश मंजाबापू पवार (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा. जोगेश्वरी आखाडा), दत्तात्रेय विठ्ठल बोंबले (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा.सावेडी, अहमदनगर), दीपक संपतराव बंगाळ (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा. राहाता) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: Ahmednagar : सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या ; खा. सदाशिव लोखंडे

संस्थेचे शासकीय लेखापरीक्षक संजय पांडू धनवडे (वय ३७, रा. सोनई) यांनी फिर्याद दिली. तीत म्हंटले की, "एक एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान कालावधीच्या लेखापरीक्षणात राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार अठ्याहत्तर रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणुक करुन अपहार झाला आहे. त्यात वरील नऊ आरोपी सहभागी आहेत." पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत.

दरम्यान, ठेवीदारांचे पैसे अडकल्याने संस्थेच्या व्यवस्थापनाविरुद्ध ठेवीदारांनी राहुरीच्या सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयासमोर आंदोलने करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: Leopard : नगर जिल्ह्यात बिबट्याची मोठी झेप ; दोन वर्षांत ३७ हल्ले

टॅग्स :AhmednagarcrimeBank Fraud