सोळावं वरीस धोक्याचं ! अल्पवयीन मुली अडकताय टपोरी मुलांच्या जाळ्यात; १४ ते १७ वयोगटातील मुलीचं जास्त प्रमाण

Crimes of abduction of minor girls: मागील आठवडाभरात तालुक्यातून सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केले. वर्षभरात ४१ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.
Crime against girls
Crime against girls Sakal

Rahuri Minor Girls Social Media Use : मागील आठवडाभरात तालुक्यातून सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केले. वर्षभरात ४१ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील ३६ मुली सापडल्या. मात्र, ५ मुलींचा आजही ठावठिकाणा नाही. त्यामुळे सोळावं वरीसं धोक्याचं... पालकांच्या चिंतेचं ठरत आहे.

टूकार मुलांच्या जाळ्यात अल्पवयीन मुली अडकत आहेत. शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीचे वर्ग मुलींवर जाळे पसरविण्याचे केंद्रस्थान ठरत आहेत. प्रेमाच्या आणाभाका, लग्नाचे आमिष, कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी अशा विविध कारणांमुळे जाळ्यात अडकणाऱ्या १४ ते १७ वर्षांच्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

वर्षभरात शंभरावर अल्पवयीन मुली जाळ्यात अडकल्या. परंतु, इज्जत व प्रतिष्ठा जपण्यासाठी बहुतांश कुटुंबांनी पोलिसांची पायरी चढली नाही, ही वस्तुस्थिती आहे. १८ वर्षांपुढील मुलींनी किंवा विवाहितेने एखाद्याच्या प्रेमात पडून घर सोडल्यास, त्या हरविल्याची फिर्याद नोंदविली जाते, तर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची फिर्याद घेतली जाते.

वर्षभरात ६ अल्पवयीन मुलींवर, तर १३ सज्ञान मुलींवर अशा एकूण १९ मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. वर्षभरात अल्पवयीन ४१ मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. पैकी ५ मुली आजपर्यंत कुटुंबातील व्यक्तींच्या किंवा मैत्रिणींच्या संपर्कात राहिल्या नाहीत.(Latest Marathi News)

पोलिस खात्याच्या मदतीने सामाजिक संघटना व सजग नागरिकांनी मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शालेय मुलींचा पाठलाग, रस्त्यावर अडवणूक, बळजबरीने बोलणे. असा प्रकार करणाऱ्या टवाळखोरांना समाजातील लोकांनी अडवावे. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे. पोलिसांनी शिक्षा करून अद्दल घडवावी.

Crime against girls
राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' आजपासून पश्चिम बंगालमध्ये; 'एकला चलो'चा नारा देणाऱ्या ममतादीदी होणार सहभागी?

मोबाईलचा दुरुपयोग..!

एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबांचा सहवास असतो. हल्ली त्रिकोणी-चौकोनी कुटुंबामुळे मुला-मुलींच्या भावनिक गरजा अपुऱ्या राहतात. त्यांना मोबाईलचा आधार मिळाला. कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणासाठी घरोघरी मुलांच्या हातात मोबाईल पडला. इंटरनेटचा वापर वाढला. अवघे जग हातात आले. पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण वाढले. सोशल मीडियाद्वारे अनोळखी मित्र-मैत्रिणी निर्माण झाल्या. तशा अल्पवयीन मुली टार्गेट होत आहेत. (Latest Marathi News) (Abuse of mobile..!)

पालकांची जबाबदारी...

  • आपल्या मुला-मुलींशी मित्रासारखा मनमोकळा संवाद ठेवावा.

  • मोबाईल गरजेपुरता वापरण्यास द्यावा. मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे.

  • मित्र-मैत्रिणी कोण आहेत. त्यांचे वर्तन कसे आहे. खेळीमेळीत चौकशी करावी.

  • शाळेतील शिक्षक, शिकवणीच्या वर्गातील शिक्षकांशी संपर्कात रहावे.

  • शिक्षकांची जबाबदारी

  • शाळेत मोबाईल वापरावर बंदी घालावी.

  • भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था, आई-वडिलांचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमबाह्य संवाद ठेवावा. (Parents responsibility...)

Crime against girls
Manoj Jarange: 'लोणावळा करार' निर्णायक ठरणार का? दोन सरकारी शिष्टमंडळं जरांगेंच्या भेटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com