Ahmednagar : पिके पाण्याखाली, शेतकरी हवालदिल

भरपाईची मागणी ः निळवंडेच्या पाण्याने बंधारा भरल्याने समस्या
Ahmednagar news
Ahmednagar newsesakal

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात निळवंडे डा२व्या कालव्याच्या पाण्याने बंधारा भरल्याने शेतकऱ्यांचे १५ एकरांहून अधिक पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. पाण्याखाली गेलेल्या शेती पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पीडित शेतकरी नानासाहेब कुंडलिक सुपेकर यांनी केली आहे.

Ahmednagar news
Investment Tips सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी नव्हे!

वडझरी खुर्द शिवारातील निळवंडे डाव्या कालव्यामधून गावाच्या उत्तरेकडील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले होते. सदर बंधाऱ्यातून निळवंडेचे पाणी पुढे कोपरगाव तालुक्यातील डांगेवाडी, मनेगाव, वेस, रांजगावगाव देशमुख (खालकर मळा), जवळके या गावांना पाणी नेण्यासाठी वडझरी खुर्द येथील शेतकऱ्यांनी कधीच विरोध केला नाही. वडझरी खुर्द शिवारातील बंधारा पाण्याने तुडूंब भरला. पूर्वीच काही लोकांनी या बंधाऱ्याचा सांडवा बुजविलेला, त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याचा थोप शेतामध्ये घुसून आपले आठ एकरांतील मका पिकाचे, तसेच भावकीतील शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांचे मोठे नुकसान झाले, असे नानासाहेब सुपेकर यांनी सांगितले.

Ahmednagar news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

आधीच आमची खरीप पिके वाया गेली होती. बंधाऱ्यातील पाणी शेतात घुसल्याने ठिबक सिंचन देखील पाण्यात वाहून गेले. संगमनेर व कोपरगावच्या संबंधित अधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते. परंतु आजपर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी नुकसान झालेल्या आमच्याकडे फिरकले नाही. त्यांनी पिकांच्या नुकसानीची दखल घेतली नाही आणि पंचनामे देखील केले नाहीत. वडझरी खुर्द येथील बंधारा भरलेला आहे. आता पुन्हा निळवंडे कालव्यातून सदर बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सर्व शेतकऱ्यांना तसेच गावांना पाणी मिळाले पाहिजे, असा आमचाही आग्रह आहे. आम्ही सहकार्य करीत आहोत. परंतु बंधाऱ्याचा सांडवा उकरून कोपरगाव तालुक्यातील गावांच्या शिवारातील बंधारे पाण्याने भरता येतील. त्यासाठी वडझरी खुर्द शिवारातील बंधाऱ्यातील सांडवा उकरून पाणी पुढे न्यावे आणि आमच्या शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी.

- नानासाहेब सुपेकर, शेतकरी, वडझरी खुर्द.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com