Investment Tips
Investment TipsEsakal

Investment Tips सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी नव्हे!

शेअर बाजार असेल किंवा सोन्याचा बाजार किंवा इतर कोणताही बाजार. सर्वसामान्य व्यक्तीला अत्यंत कमी भावामध्ये कधीही खरेदी करायला जमत नाही. याला ‘बॉटम फिशिंग’ असे म्हणतात. परंतु ते सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळेस सध्याचे सोन्याचे भाव हे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक Investment करण्यासाठी अत्यंत चांगले भाव आहेत.

महेंद्र लुनिया

जगामधील सर्वच गुंतवणूकदारांना सर्वांत सुरक्षित असे गुंतवणुकीचे साधन कोणते असे विचारल्यास ते तुम्हाला ‘सोने’ हेच सांगतील आणि ते खरेही आहे. महागाईचा वाढता आलेख आणि त्याला बरोबरी करू शकणारे एकमेव चलन Currency म्हणजे ‘सोने.’ या सोन्याच्या भावावर जगभरामधील विविध घटक प्रभाव टाकत असतात. जगात अनिश्चितता निर्माण झाली, की सोन्याचे भाव वाढायला लागतात. (Investment Tips in Marathi Know what is the right way of investing in gold)

मार्च २०२० मध्ये कोरोना महासाथीमुळे जग ठप्प झाले आणि सोन्याने Gold आपल्या भावाचा उच्चांकी भाव गाठला. प्रति १० ग्रॅमला ६४ हजार रुपये भाव झाला होता. जसेजसे हे लक्षात आले, की कोरोनाला Corona आपण हरवू शकतो, तसतसा सोन्याच्या भाव खाली येत गेला आणि तो अगदी ४६ हजार रुपयांपर्यंत खाली आला.

परंतु त्यानंतर विविध देशांनी आणि त्यांच्या बँकांनी Banks कोरोनानंतर आलेली मरगळ हटविण्यासाठी, चलन छापण्याचा सपाटा लावला आणि जगभरामध्ये रोकड तरलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, कोरोनामुळे ज्या ठिकाणी सर्वच उद्योग बंद होते, त्या ठिकाणावरून कितीही प्रयत्न केला तरी नफा Profit निघत नव्हता. अशा वेळेस ही रोकड तरलता चलनवाढीचा Inflation रोग घ्यायला लागली आणि सोन्याचे भाव ५२ हजारांपर्यंत आले. यानंतर रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धामध्ये प्रथमतः मदत करणारे देश सहभागी होतात की काय या धास्तीमुळे सोन्याच्या भावाने उचल खाल्ली आणि पुन्हा एकदा सोने ६१ हजारांपर्यंत गेले.

त्यानंतर या युद्धाला दीड वर्षाचा कालावधी लोटला आणि इतर देश या युद्धामध्ये भाग घेणार नाहीत हे जवळपास निश्चित झाल्यानंतर मात्र सोन्याचे भाव हळूहळू कमी व्हायला लागले. त्याला अजून एक कारण होते ते म्हणजे अमेरिकी सरकार. आपल्या आतापर्यंतच्या इतिहासामधील सर्वांत जास्त कर्जबाजारी झालेला हा देश आहे.

केवळ एक वर्षाच्या कालावधीमध्ये (२०२२-२३) अमेरिकी सरकारने दोन ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त कर्ज जागतिक बाजारांमधून घेतलेले आहे. यामुळे त्या सरकारच्या बाँडचा ‘यील्ड’ अर्थात परतावा हा गेल्या ११ वर्षांतील सर्वांत उच्चांकी स्तरावर गेलेला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा ५६ हजारांपर्यंत खाली आले.

हे देखिल वाचा -

Investment Tips
New Age Gold : 'न्यु एज गोल्ड', बचतीचा नवा फंडा? काय आहे जाणून घ्या!

अशातच शांततेला दृष्ट लागली आणि हमास या संघटनेने इस्राईलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. इस्राईलची मानसिकता समजणाऱ्या लोकांना लगेचच लक्षात आले, की आता या ठिकाणी युद्धाची सुरुवात होणार आहे. ती शक्यता दुसऱ्या दिवशीच खरी ठरली. इस्राईल पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टी या ठिकाणी अक्षरशः आग ओकली आणि युद्धाला तोंड फुटले. त्यामुळे सोन्याने एका दिवसामध्ये शंभर डॉलरची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढ नोंदवली, तर भारतीय बाजारामध्ये सोन्याने पुन्हा एकदा ६० हजारांचा टप्पा गाठला.

सोन्यामध्ये गुंतवणूक करावी?

आता अशा वेळेस प्रश्न पडतो, की सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की करू नये? जर सोन्यातच गुंतवणूक करायची तर ती कोणत्या प्रकारे आणि कुठे करावे, ते समजून घेऊ या.

शेअर बाजार असेल किंवा सोन्याचा बाजार किंवा इतर कोणताही बाजार. सर्वसामान्य व्यक्तीला अत्यंत कमी भावामध्ये कधीही खरेदी करायला जमत नाही. याला ‘बॉटम फिशिंग’ असे म्हणतात. परंतु ते सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळेस सध्याचे सोन्याचे भाव हे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत चांगले भाव आहेत.

२०१३ पासून २०२३ पर्यंत सोन्याचे आंतरराष्ट्रीय भाव पाहिले, तर सोन्याने १३०० ते १८०० डॉलरच्या बाहेर भाव दाखवलेले नाहीत, याला अपवाद कोरोनाकाळ आहे. ज्यावेळेस २२०० डॉलरपर्यंत भाव दाखवले गेले होते, तेव्हा असा अंदाज होता, की सोन्याचा ही फेज संपलेली असून, आता सोने लवकरच २००५ डॉलर होताना दिसेल आणि त्यामुळे भारतीय रुपयांमध्ये सोन्याचे भाव ६५ हजारांच्या वर जाताना दिसू शकतात.

मग असा प्रश्न येतो, की सध्या आपण सोने कसे खरेदी केले पाहिजे? आपण गुंतवणुकीकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. सोन्यामधील गुंतवणूक हा माझा शब्द नीट लक्षात घ्या. मी दागिन्यांवर बोलत नाही, कारण दागिने ही गुंतवणूक होऊ शकत नाही. दागिने करणे ही आपली हौस आहे आणि हौसेला मोल नाही.

दागिने बनवण्यासाठी घडणावळ द्यावी लागते आणि या सर्व खर्चानंतर ज्यावेळेस आपण ते दागिने विक्री करायला जातो, त्यावेळेस विक्रीची योग्य किंमतसुद्धा आपल्याला मिळत नाही. कारण सोन्याची प्रत कमी झालेली असते. अशा वेळेस सोन्यामधील गुंतवणूक या शब्दाला जागायचे असेल तर आपल्याला डोळसपणे गुंतवणूक करावी लागेल. शुद्ध सोने हे बिस्कीट किंवा वेढणीच्या स्वरूपात घेणे हे दागिन्यांपेक्षा योग्य आहे.

हे देखिल वाचा -

Investment Tips
Sovereign Gold Bond: 'या' सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट, तुम्ही गुंतवणूक केली आहे का?

डिजिटल गोल्ड आणि गुंतवणूक

डिजिटल गोल्ड हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. सोन्यामधील गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे सोव्हरिन गोल्ड बाँड. प्रत्यक्ष सोने खरेदी केले तर ते सांभाळण्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागते. मग ते लॉकरमध्ये ठेवण्यासाठी असेल किंवा घरामध्ये. सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये ज्या भावामध्ये तुम्ही खरेदी केलेली आहे, तो भाव प्रत्यक्ष बाजारात बघायला मिळतो आणि विक्री करताना समोर आपण काय भावाला विक्री करत आहोत, हे दिसत असते.

त्यानंतरच आपण सोन्याची विक्री करतो. विक्री केल्यानंतर अगदी नगण्य कमिशन कट होऊन आपल्याला दुसऱ्या दिवशीच रक्कम मिळून जाते. शिवाय या बाँडवर आपल्याला वार्षिक अडीच टक्के व्याजही मिळू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा साँव्हरिन गोल्ड बाँड खरेदी करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

तसेच शेअर बाजारामध्ये खरेदी-विक्री होणारे ‘गोल्ड बीज’सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, विक्री करू शकता आणि सांभाळू शकता. यात घडणावळ लागत नाही किंवा खरेदी-विक्रीमध्ये फार मोठा फरकही नसतो. अजून एक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड बाजारामध्ये खरेदी-विक्री होणारे गोल्ड फंड किंवा ‘ईटीएफ’. याची सुद्धा आपल्याला खरेदी-विक्री करता येते आणि आपल्या डिमॅट खात्यामध्ये त्याला स्थान देता येऊ शकते.

आपण गुंतवणुकीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक केली, तर येत्या तीन-पाच वर्षांमध्ये सोन्याचा भाव ७० ते ७५ हजारांवर जाताना दिसू शकतो. त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा करून घेऊ शकता.

(लेखक विघ्नहर्ता गोल्ड लि.चे संचालक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com