याला म्हणतात बँक, कोविडच्या महामारीतही दिला कर्मचाऱ्यांना २४ टक्के बोनस

Ahmednagar District Bank will give 24% bonus
Ahmednagar District Bank will give 24% bonus

नगर ः कोविडच्या महामारीत बहुतांशी कंपन्यांनी तसेच बँकांनी हातच नव्हे तर गुडघेही टेकले आहेत. अनेकांना नोकरीपासून हात धुवावे लागले. पगारवाढ तर सोडाच सध्याची नोकरी टिकवणेही मुश्कील झाले आहे. बहुतांशी क्षेत्रात अशी स्थिती आहे. मात्र, नगरच्या जिल्हा बँकेने कमालच केली आहे. त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे कर्मचारी तर सुखावलेच, परंतु सचिवांनाही आनंदाचे भरते आले.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सेवकांना बॅंकेने 24 टक्के बोनस देण्याचा व त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवांसाठी जिल्हा बॅंक अंशदान तसेच बॅंकेच्या कायमसेवकांबरोबरच कंत्राटी असणाऱ्या सेवकांनाही बोनस देणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, बॅंकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले तसेच बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली. 

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सेवक हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बॅंकेचे काम करतात शासनाने राबवलेल्या कर्जमाफीचे धोरणाचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बॅंकेच्या सेवकांनी मोलाचे कार्य केले आहे.

शेतकऱ्यांचा विमा, शेतकऱ्यांसाठी विविध  कर्जे, शासनाच्या विविध योजना अशा अनेक बाबतीत बॅंकेच्या सेवकांनी चांगले काम केले आहे. याचा एक भाग म्हणून संचालक मंडळने हा निर्णय घेतला आहे. बॅंक ग्रामीण क्षेत्रात काम करत असताना विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बॅंक अर्थ सहाय्य करते.

हे करत असताना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने त्यांनाही अंशदान स्वरूपात मदत करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णयही बॅंकेने घेतला असल्याचे गायकर यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com