

अहिल्यानगर: नगर शहरातील एका नामांकित डॉक्टरला जवळपास एका टोळीने १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जागेच्या व्यवहारातून २०१७ ते २०२१ या काळात फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात डॉ. सुर्यभान आठरे पाटील यांच्या फिर्यादीवरून माजी नगरसेवक स्वप्निल रोहीदास शिंदे याच्यासह २५ ते ३० जणांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.