आता जागा द्या !आमदार आशुतोष काळेंची मागणी कोपरगाव MIDC मंजूर पण जागेचा प्रश्न उपस्थित

कोपरगाव ‘एमआयडीसी’मुळे विकासाला चालना, आशुतोष काळे यांची माहिती : सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय
आता जागा द्या !आमदार आशुतोष काळेंची मागणी  कोपरगाव MIDC मंजूर पण जागेचा प्रश्न उपस्थित

Kopargaon MIDC: महायुती सरकारने काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे, सोनेवाडी शिवारात एमआयडीसीला दिलेली मंजुरी हे आपल्या पाठपुराव्याचे फलित आहे. कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

एमआयडीसी प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यासाठी पुढाकार घेणारे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आपण मतदार संघाच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. आता या दोन्ही मंत्र्यांनी कोपरगाव शहरानजीक असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असलेल्या जागेच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.

ते म्हणाले, की मागील विधानसभा निवडणुकीत आपण औद्योगिक वसाहत उभारणीचे अश्वासन जाहिरनाम्यात दिले होते. त्याची पूर्तता झाली आहे. यापूर्वीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री अदिती तटकरे यांनाही निवेदन देऊन पाठपुरावा केला होते. दोन बैठकांत त्यावर चर्चा देखील झाली होती. त्यानंतर आपण मंत्री विखे पाटील आणि सामंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. विखे पाटील यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प वेगाने मार्गी लागला.

आता जागा द्या : काळे

रेल्वेस्थानक, विमानतळ, समृद्धी महामार्ग, सिन्नर-शिर्डी महामार्ग, नगर कोपरगाव महामार्ग, नागपूर-मुंबई जलदगती मार्ग या सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्रस्तावित सूरत-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग कोपरगाव मतदारसंघातून जात आहे. औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी ही अनुकूल परिस्थिती आहे. आता कोपरगाव औद्योगिक वसाहतीसाठी जागा देण्याची आमची मागणी या दोन्ही मंत्र्यांनी पूर्ण करावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.(Latest Marathi News)

आता जागा द्या !आमदार आशुतोष काळेंची मागणी  कोपरगाव MIDC मंजूर पण जागेचा प्रश्न उपस्थित
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी शब्द टाकला अन् अमित शहा कोल्हापूरला येण्यास झाले तयार; काय आहे कारण?

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाठपुराव्यास अखेर यश आले.

राज्य मंत्रिमंडळाने कोपरगाव -शिर्डी येथे ५०२ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या एमआयडीसीला मंजूर दिली. २०१८ पासून उद्योग मंत्रालयासह महसूलमंत्रालयात जागेचे सात-बारा उताऱ्यासह केलेला पाठपुरावा, स्थानिक दहा हजार बेरोजगारांची सह्यांची मोहीम या प्रयत्नामुळे प्रस्तावित एमआयडीसीला मंजुरी मिळाली. स्थानिक बेरोजगारांसाठी ही एमआयडीसी पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी दिली.

भाजप संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे बोलत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी फटाके फोडून पेढे वाटून प्रस्तावित एमआयडीसी मंजुरीचा आनंद व्यक्त केला. कोल्हे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप नेत्या, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा हजार युवकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली.(Latest Marathi News)

आता जागा द्या !आमदार आशुतोष काळेंची मागणी  कोपरगाव MIDC मंजूर पण जागेचा प्रश्न उपस्थित
Sanju Samson T20 World Cup : भारतीय संघाची घोषणा झाली अन् संजू सॅमसनच्या टी 20 वर्ल्डकप खेळण्याच्या आशेवर फिरलं पाणी?

शेतकऱ्यांची एक गुंठा जमीन न जाता शेती महामंडळाच्या जागेवर नूतन एमआयडीसी प्रस्तावित करण्यासाठी संवत्सर, चांदेकसारे ब्लॉक येथील शेती महामंडळाच्या जमिनीचे सात-बारा उताऱ्यासह मागणी करण्यात आली होती. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रस्ताव सादर करून निवेदन दिले. महसूलकडून जागा उपलब्ध करून घेण्यासाठी पत्रव्यवहार केला.

विना मोबदला जमीन मिळावी, म्हणून तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुंगटटीवर यांच्या निधीची मागणी केली. या सर्व पाठपुराव्यास यश मिळाले. तालुक्यातील चांदेकसारे ब्लॉकची जवळपास २३२ एकर जमिनीचा एमआयडीसीअंतर्गत वापर होणार असल्याचे शेवटी कोल्हे म्हणाले.

तालुक्याचा शैक्षणिक हब म्हणून राज्यात नावलौकिक आहे. संवत्सर(कोपरगाव) येथे वॉटरलेस इंडस्ट्री म्हणून भविष्यात आयटी हब होऊ शकतो. टुरिझम, टेक्निकल, टेक्स्टाईलचा विचार करता शासनाने शिर्डी-कोपरगाव-येवला (स्काय) असा कॉरिडॉर विकसित केल्यास कोपरगाव हे या सर्वांचे केंद्रबिंदू ठरू शकेल- विवेक कोल्हे, अध्यक्ष, शंकरराव कोल्हे कारखाना (Latest Marathi News)

आता जागा द्या !आमदार आशुतोष काळेंची मागणी  कोपरगाव MIDC मंजूर पण जागेचा प्रश्न उपस्थित
Rajasthan Politics: राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग, निवडणूक निकालापूर्वी CM अशोक गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com