Laxman Kevate: एसटीचे पहिले कंडक्टर ९९ वर्षे जगले, असं होतं त्यांच्या आरोग्याचं रहस्य

केवटे यांचा जन्म १७ ऑगस्‍ट १९२४ रोजी झाला. घरातील हलाखीच्या स्थितीमुळे त्यांनी शालेय जीवनापासूनच लहान-मोठी कामे केली. त्यांना एकदा पुण्याला खासगी बसने जाण्याचा योग आला. त्यावेळी ते बसवाहकाच्या शेजारी बसले होते. त्यावेळी त्यांनी बसवाहक होण्यासाठी काय करावे लागते याची माहिती घेतली,
Laxman Kevate: एसटीचे पहिले कंडक्टर ९९ वर्षे जगले, असं होतं त्यांच्या आरोग्याचं रहस्य

अहमदनगर - राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस एक जून १९४८ रोजी अहमदनगर- पुण्यादरम्यान धावली. या बसचे पहिले चालक किसन राऊत व पहिले वाहक लक्ष्मण शंकर केवटे हे होते. त्यांतील लक्ष्मण केवटे (वय ९९) यांचे बुधवारी (ता. १७) रात्री नऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

Laxman Kevate: एसटीचे पहिले कंडक्टर ९९ वर्षे जगले, असं होतं त्यांच्या आरोग्याचं रहस्य
Chhatrapati Sambhaji Nagar : चक्क कांदा चाळीत सुरू होता जुगार अड्डा!

केवटे यांचा जन्म १७ ऑगस्‍ट १९२४ रोजी झाला. घरातील हलाखीच्या स्थितीमुळे त्यांनी शालेय जीवनापासूनच लहान-मोठी कामे केली. त्यांना एकदा पुण्याला खासगी बसने जाण्याचा योग आला. त्यावेळी ते बसवाहकाच्या शेजारी बसले होते. त्यावेळी त्यांनी बसवाहक होण्यासाठी काय करावे लागते याची माहिती घेतली,

Laxman Kevate: एसटीचे पहिले कंडक्टर ९९ वर्षे जगले, असं होतं त्यांच्या आरोग्याचं रहस्य
Mumbai Black Magic : अंनिसने केली कोंबड्याची सुटका, सुशिक्षितांच्या डोंबिवलीत ब्लॅक मॅजिकचा प्रकार

तसेच बसवाहकाचा परवाना काढून घेतला होता. त्यानंतर एसटी महामंडळाने घेतलेल्या निवड चाचणीत त्यांची वाहक म्हणून निवड झाली. त्यावेळी पुण्याहून दोन बस नगरला आणण्यात आल्या. शहरातील माळीवाडा वेशीजवळून या बस पुण्याला सोडण्यात आल्या. केवटे हे अहमदनगर- पुणे बसचे पहिले वाहक होते.

Laxman Kevate: एसटीचे पहिले कंडक्टर ९९ वर्षे जगले, असं होतं त्यांच्या आरोग्याचं रहस्य
Mumbai : सर्पदंशामुळे कल्याणमधील मुलाचा मृत्यु

त्यांना सुरवातीच्या काळात ८० रुपये पगार होता. त्यानंतर १५० रुपयांपर्यंत पगार मिळू लागला होता. अहमदनगर ते पुणे या अंतरासाठी पहिल्या बसचे भाडे अडीच रुपये होते. एसटी महामंडळाच्या स्थापनादिनी त्यांना सन्मानित केले जात होते. राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक बसचा प्रारंभ अहमदनगरला केवटे यांच्या हस्तेच करण्यात आला होता. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. एसटीतील कर्मचारी जयप्रकाश केवटे यांचे ते वडील होत.

व्यसनांपासून लांब

लक्ष्मण केवटे यांना कोणतेही व्यसन नव्हते. त्यामुळेच आपल्याला चांगले आरोग्य लाभल्याचे ते नेहमी सांगत. तरुणाईसह सर्वांनीच व्यसनांपासून लांब राहावे, असा वडिलकीचा सल्लाही ते नेहमी देत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com