Ahmednagar: बिबट्याची डरकाळी भीतिदायक

८३९ जनावरांचा फडशा; ९८३ प्रकरणांत ९४ लाख २० हजारांची भरपाई
leopard
leopard Canva

अहमदनगर : जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे, यासाठी अनेक गावांतून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. मात्र, बिबटे जास्त व पिंजरे कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षभरात बिबट्यांनी ८३९ पशुधनाचा फडशा पाडला आहे. तसेच ९८९ प्रकरणांत वन विभागाने ९४ लाख २० हजार १७२ रुपयांची भरपाई संबंधितांना दिली आहे.

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत दोन व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केला आहे. यामध्ये एकूण २० लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यात कोपरगाव व पारनेर तालुक्यांत जीवित हानीची घटना जास्त आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांत कोपरगावात दहा, राहुरी तीन, तिसगाव एक, श्रीगोंदे दोन, अहमदनगर तीन, पारनेर दोन, पाथर्डी तीन, असे एकूण २४ जण जखमी झाले आहेत. यात दहा लाख ७२ हजार ७७२ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.

बिबट्यांनी हल्ला करून ८३९ पशुधनाचा फडशा पाडला आहे. यामध्ये कोरगावमध्ये २१८, राहुरीत २३६, टाकळीढोकेश्वर- १८, तिसगाव- १५, श्रीगोंदे- ५१, कर्जत- ३३, अहमदनगर- ११५, पारनेर- १४७, पाथर्डी- सहा पशुधनाचा समावेश आहे.

वन्य प्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीच्या १२ घटना घडल्या आहेत. यामध्ये वन विभागातर्फे सहा लाख ९० हजारांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यामध्ये कोपरगावमध्ये २१, टाकळी ढोकेश्वर दोन, तिसगाव एक, श्रीगोंदे ः ४३, कर्जत ः पाच, अहमदनगर ः ३०, पारनेर ः चार, पाथर्डी ः १८ अशा घटना घडलेल्या आहेत.

वन्य प्राण्यांचे हल्ले व भरपाई

मनुष्य मृत्यू प्रकरणे दोन

त्याअंतर्गत अनुदानवाटप २० लाख

मनुष्य जखमी प्रकरणे २४

अनुदान वाटप १०७२७७२

शुधन नुकसान प्रकरणे ८३९

अनुदान वाटप ५६५७४००

पीक नुकसान प्रकरणे १२४

अनुदान वाटप ६९००००

एकूण प्रकरणे ९८९

एकूण नुकसान भरपाई ९४२०१७२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com