Ahmednagar News : आरोग्य विभागाला उपचाराची गरज

राधाकृष्ण विखे याच्या आरोग्य विभागाची बैठक बोलविण्याची सूचना
vikhe patil
vikhe patilsakal

कोल्हार - राहाता तालुक्यातील आरोग्य विभागाचे आरोग्य बिघडले असून कामचुकारांवर आता कारवाई करावीच लागणार आहे. कामाच्या वेळेत पूर्ण वेळ हजर न राहता केवळ सह्या करून निघून जाणाऱ्यांना चांगला गुण येण्यासाठी मोठ्या उपचार करू, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.

कोल्हार (ता.राहाता) येथील एका रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे होते. यावेळी प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप उपस्थित होते.

vikhe patil
Pune : पंचलिंग शिवालयात स्वयंभू पाच शिवलिंग,तांदळाच्या पिंडीच्या दर्शनास मोठी गर्दी

तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत  विखे पाटलांकडे नागरिकांनी तक्रारी  केल्या आहेत. त्यामुळे विखे यांनी आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत या विषयासंदर्भात पुढील आठवड्यात आरोग्य विभागाने बैठक बोलवावी, अशी सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांना केली.

vikhe patil
Solapur : वाहतूक पोलिस दलातील प्रत्येक अंमलदाराला दररोज २० वाहनांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट

विखे म्हणाले, की राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील काही आरोग्य अधिकारी कामाच्या वेळेत त्याजागी हजर न राहता सकाळी फक्त कामावर येतात व सह्या करून दुपारी एक नंतर गायब होतात. याची नोंद माझ्याकडे असून त्याची मी गांभीर्याने दखल घेतली आहे. बेफिकीर कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल असेही विखे यांनी स्पष्ट केले.

vikhe patil
Beed News : नवे बीड ‘अस्वच्छ अन् बकाल’ मोकाट जनावरांसोबत आता कुत्र्यांचाही मुक्त संचार नगरपरिषदेचा ‘ढिसाळ’ कारभार

रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

अहमदनगर -कोपरगाव या राष्ट्रीयमार्गाच्या दुरुस्तीसाठी ७०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ते काम सध्या सुरू झाले आहे. यामुळे वाहन धारकांमध्ये समाधानाचे वातावरण अाहे. रस्‍ता चांगला होणार असल्‍यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com