Pune-Nashik Semi High Speed Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीडने संगमनेरची गती वाढणार! औद्योगिकीकरणालाही मिळणार चालना

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेने केवळ दोन महानगरांना नव्हे, तर विकासाच्या वर्तुळाला जोडले जाणार असल्याने नवी ओळख निर्माण होईल.
Pune-Nashik Semi High Speed Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीडने संगमनेरची गती वाढणार! औद्योगिकीकरणालाही मिळणार चालना

Pune Nashik Semi High Speed: अमृत उद्योग समूह, मालपाणी उद्योग समूह, श्रमिक उद्योग समूह, एस. आर. थोरात दूध, हायटेक बसस्थानक, प्रशस्त शासकीय कार्यालये, केजी टू पीजीपर्यंत शैक्षणिक संस्था, अत्याधुनिक सुविधांयुक्त दवाखाने, सराफा बाजार, कापड बाजार, सहकारी संस्था अशा अनेक गोष्टींनी समृद्ध असणाऱ्या संगमनेरची ओळख राज्यात झालेली आहे. आता पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेने केवळ दोन महानगरांना नव्हे, तर विकासाच्या वर्तुळाला जोडले जाणार असल्याने नवी ओळख निर्माण होईल.

अत्यंत रहदारी असणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण झाल्यानंतर दळणवळणाला चालना मिळाली. हा जुना महामार्ग शहरातून जात होता. मात्र, शहरातील रहदारी कमी करण्यासाठी हा बाह्यवळण मार्गाने गेला. त्यामुळे मालवाहतूक वाहने शहराबाहेरून जात असल्याने काही अंशी वाहतुकीची समस्या मिटण्यास मदत झाली. परंतु, समृद्ध शहरांसह तालुक्याला अधिक वेगवान होण्यासाठी सेमी हायस्पीड रेल्वेमुळे मदत होणार आहे.

२३२ किलोमीटर हा सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग असून, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच (महारेल) हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. याबाबत नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुधारित प्रकल्प आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय लवकरच भूसंपादन करणार असल्याचे संकतेही दिले आहे.(Latest Marathi News)

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे संगमनेरच्या कृषी व औद्योगिकीकरणाला देखील गती मिळणार आहे. पुणे व नाशिक या दोन शहरांसह इतरही शहरांना यामुळे जोडले जाणार आहे.

शेतकऱ्यांना आपला शेतीमाल पाठवणे सहज सोपे होईल, तर औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असणारा माल पुरवठा देखील वेळेत होईल. यामुळे वेळेसह पैशांची देखील बचत होईल. याचबरोबर नाशिक व पुणे येथे नोकरी व व्यवसायासाठी जाणारे चाकरमानी यांची मोठी सोय होईल. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होईल, याकडे संगमनेरवासीयांचे लक्ष लागून आहे.

Pune-Nashik Semi High Speed Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीडने संगमनेरची गती वाढणार! औद्योगिकीकरणालाही मिळणार चालना
Ranji Trophy : इंग्लंड मालिकेपूर्वी अग्रवालने ठोकले आक्रमक शतक! दोन वर्षांपूर्वी खेळली होती शेवटची कसोटी

प्रकल्पाची वैशिष्ट्ये...

  • २३२ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग

  • पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार

  • रेल्वेचा २०० किलोमीटर प्रतितास वेग, पुढे हा वेग २५० किलोमीटरपर्यंत वाढविणार

  • पुणे-नाशिक अंतर अवघ्या पावणेदोन तासांत

  • पुणे-नाशिकदरम्यान २४ स्थानकांची आखणी

  • १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित

  • रेल्वेस्थानकात प्रकल्पबाधितांसह स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य

  • विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वेलाइनचे बांधकाम (Latest Marathi News)

सध्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्रीसाठी पुणे-नाशिक या ठिकाणी घेऊन जावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणीही निर्माण होत असतात. जर रेल्वे प्रकल्प लवकर झाला, तर शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल बाजारात लवकर नेता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे, तसेच प्रवासही चांगला होणार असून वेळेचीही बचत होणार आहे. -बाळासाहेब ढोले, सरपंच, आंबीखालसा.

Pune-Nashik Semi High Speed Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीडने संगमनेरची गती वाढणार! औद्योगिकीकरणालाही मिळणार चालना
Milind Deora Join Shivsena: मिलिंद देवरांचा काँग्रेसला रामराम; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com