Ahmednagar Rain News :सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? नंदीबैलाला पाहून भल्याभल्यांना प्रश्‍न विचारण्याचा आवरेना मोह

यंदा पावसाने गुंगारा देऊन तथाकथित हवामानतज्ज्ञांचे अंदाज फोल ठरविले.
Nandibaila
Nandibaila sakal

Ahmednagar News : यंदा पावसाने गुंगारा देऊन तथाकथित हवामानतज्ज्ञांचे अंदाज फोल ठरविले. काल-परवापर्यंत कौतुकाचा वर्षाव झेलणाऱ्या या तज्ज्ञांना यंदा लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली. विहिरींनी तळ गाठले अन् खरीप हातचे गेले.

दुष्काळाची चाहूल लागत असताना नंदीबैल गावात आला. त्याला पावसांचा अंदाज विचारण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आला नाही. त्यानेही कुणाला नाराज केले नाही.

Nandibaila
PKL 2021 : U MUMBA नं 30 सेकंदात पलटलेला सामना अखेर बरोबरीत

यंदा तज्ज्ञांचेच अंदाज चुकल्याने नंदीबैलाची जबाबदारी आपसूक कमी झाली. पावसाच्या अंदाजाबरोबर आपल्या धन्याच्या पोटावर तोल सावरत सहजपणे उभे रहाण्याचा परंपरागत खेळ करून हे नंदीबैल ग्रामस्थांची मने जिंकत आहेत.

कोणे एकेकाळी नंदीबैल मान हलवील त्यानुसार नंदिवाला पावसाचा अंदाज व्यक्त करायचा. डिजिटल क्रांती झाल्यावर हातातल्या मोबाईलवर देशी-विदेशी कंपन्यांचे अॅप पावसाचा दैनंदिन आणि तासनिहाय अंदाज देऊ लागले. ते बऱ्यापैकी खरे ठरत असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय देखील झाले.

गेल्या दोन-तीन वर्षांत पावसाने प्रमाण वाढले आणि वेळापत्रक देखील बदलले. याकाळात वाढलेल्या पावसामुळे काही स्वयंघोषित हवामानतज्ज्ञांचे अंदाज देखील बरोबर येऊ लागले.

Nandibaila
Ajit Pawar in Pune : पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, ''तुझ्या तोंडात साखर पडो''

यंदा मात्र या तज्ज्ञांची पावसाने चांगलीच गोची केली. पावसाळ्यातल्या पहिल्या तीन महिन्यांत त्यांचा एकही अंदाज खरा ठरला नाही.

त्यामुळे कालपरवापर्यंत ज्या तज्ज्ञांना लोक डोक्यावर घेत, त्यांना या पावसाळ्यात त्यांचे अंदाज सपशेल चुकल्याने लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यंदा पावसाळ्यातले पहिले तीन महिने संपले, तरी पाऊस न पडल्याने सर्वांचा नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

पावसाच्या अंदाजाचा आणि नंदीबैलाच्या मान हलविण्याचा काहीही संबंध नाही, हे ठावूक असूनही पावसाच्या ओढीपायी भलीभली मंडळी त्याला पाहून नंदीबैल, नंदीबैल पाऊस पडेल का असा प्रश्न विचारीत आहेत आणि नंदीबैलही तेवढ्यात उत्साहाने मान हलवून पाऊस पडेल, असा दिलासा देत आहेत. हा दिलासा प्रत्यक्षात येण्याची चिन्हे मात्र दिसत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com