Shirdi Helicopter Service: शिर्डीत हेलिकॉप्टर सफरीची संधी! तीन दिवसांत अडीचशेच्यावर जणांनी लुटला सेवेचा आनंद, दर फक्त..

आकाशात उंचावरून जाणाऱ्या हेलिकॉप्टरकडे उत्सुकतेने पाहणाऱ्या सामान्यजनांसाठी येथील पर्यटन मार्गदर्शक विजय जेजूरकर यांनी एक अनोखी सेवा सुरू केली.
Shirdi Helicopter Safari
Shirdi Helicopter Safari Esakal

Ahmednagar Shirdi Helicopter Ride Opportunity: आकाशात उंचावरून जाणाऱ्या हेलिकॉप्टरकडे उत्सुकतेने पाहणाऱ्या सामान्यजनांसाठी येथील पर्यटन मार्गदर्शक विजय जेजूरकर यांनी एक अनोखी सेवा सुरू केली.

पाच हजार रुपये शुल्क आकारून सात ते आठ मिनिटांची हेलिकॉप्टर सफर करण्याचा आनंद लुटण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. गेल्या तीन दिवसांत अडीचशे आबालवृद्धांनी या आनंददायी हेलिकॉप्टर सफरीचा आनंद लुटला. चांगला प्रतिसाद मिळाला, तर ही सेवा शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरू शकेल.

येथून जवळच असलेल्या जंगली महाराज आश्रमाच्या हेलिपॅडवरून ही सेवा सुरू करण्यात आली. आपले आई-वडील अन् आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफरीचा आनंद देण्यासाठी ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील नोकरदार मुले आणि तरुण शेतकरी या संधीचा लाभ घेत आहेत. शाळकरी मुलांची हौस भागविण्यासाठी त्यांचे पालक पुढे येत आहेत. (Latest Marathi News)

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना जेजूरकर म्हणाले की, सामान्य आर्थिक उत्पन्न गटातील कुटुंब डोळ्यांसमोर ठेवून कमीत कमी शुल्क घेऊन साईबाबा एव्हिएशन या कंपनीने ही सेवा सुरू केली. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. या दराने सध्यातरी ही सेवा काटकसरीने सुरू आहे. असाच प्रतिसाद कायम राहिला, तर शिर्डीच्या धार्मिक पर्यटनात ही हेलिकॉप्टर सवारी एक आकर्षण ठरू शकेल.

Shirdi Helicopter Safari
Rajendra Patni: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला अन् राजेंद्र पाटणी नाव राज्यभरात गाजलं, असा होता त्यांचा राजकीय प्रवास

शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या व्हीव्हीआयपी भाविकांसाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून मुंबई ते शिर्डी, अशी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. त्यांच्या मागणीवरून आम्ही त्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करून देतो. मात्र, पाच हजार रुपये खर्च करण्याची ऐपत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांना हेलिकॉप्टर सफरीचा आनंद मिळावा, यासाठी ही सेवा सुरू केली. मुंबई, पुणे आणि गोव्या पाठोपाठ आता शिर्डीत ही सेवा सुरू झाली आहे.- विजय जेजूरकर, पर्यटन मार्गदर्शक (Latest Marathi News)

Shirdi Helicopter Safari
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी पहिल्यांदाच घरी बसून करता येणार मतदान; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com