Shirdi Loksabha: विखेंसह ‘समिती’ची हवी गॅरंटी, लोखंडेंसमोर उमेदवारीपूर्वीच ताल अन् तोल सांभाळण्याचे आव्हान

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयाची गॅरंटी घेतली. महायुतीमुळे त्यांना ती घेणे भाग देखील होते.
Shirdi Loksabha
Shirdi Loksabha Esakal

Shirdi Loksabha Constituency: काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयाची गॅरंटी घेतली. महायुतीमुळे त्यांना ती घेणे भाग देखील होते. दुसरीकडे निळवंडे कृती समिती अन् विखे पाटलांचे पूर्वीपासून जमत नाही. त्याचवेळी ही समिती आणि लोखंडे यांना एकमेकांवाचून पर्याय नाही. त्यामुळे आता या अडचणीतून मार्ग काढण्याची आणि सर्वांचा ताल व तोल सांभाळण्याची कसरत करण्याची वेळ लोखंडे यांच्यावर आली आहे.

मतदारसंघ राखीव आणि शुगर लॉबीचे वर्चस्व, यामुळे संपूर्ण मतदारसंघात एकाचवेळी प्रचार यंत्रणा उभी करायची असेल, तर लोखंडेंना विखे पाटलांशिवाय पर्याय नाही. भाजपने त्यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी सोपवीली आहे. शिवसेना फुटल्यानंतर लोखंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

त्यामागे निधी मिळवीणे हा जसा उद्देश होता, तसा पालकमंत्री या नात्याने विखे पाटलांची शक्ती निवडणुकीत आपल्यामागे उभी राहील, हा व्यवहारी हिशेब देखील होता. पहिला हेतू साध्य झाला. आता निवडणूक सुरू झाली. मात्र निळवंडेच्या पट्ट्यात कार्यरत असलेली कृती समिती आणि विखे पाटलांत सख्य काही झालेले नाही. सत्तेत असताना, निळवंडेच्या प्रश्नी सहकार्य घेण्यासाठी या समितीच्या सदस्यांनी थोरातांच्या कार्यक्रमांना वेळोवेळी हजेरी देखील लावली आहे.(Latest Marathi News)

निळवंडे धरण आणि कालव्यांच्या प्रश्नावर लोखंडे यांनी जलदिंडी, आझाद मैदानावरील धरणे, केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांच्या गाठीभेटी तसेच अन्य आंदोलने लोखंडे यांनी केली. त्यात या कृतिसमितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग होता. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले. डाव्या कालव्याची चाचणी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या निमित्ताने दौरे झाले.

Shirdi Loksabha
Election Commission of India : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! सहा राज्यांमधील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश

त्यात विखे पाटलांनी सक्रिय भूमिका बजावली. मात्र निळवंडे कृती समितीचे आणि त्यांचे सूर काही जुळले नाहीत. लोखंडे यांना या निवडणुकीत विखे पाटलांचे राजकीय बळ हवे आहे. त्याचवेळी निळवंडे कृतिसमीतीची पूर्वीपासूनची साथ देखील हवी आहे. त्यातून मध्यम मार्ग काढण्याचे काम सध्या सुरू आहे. (Latest Marathi News)

Shirdi Loksabha
Arati Ankalikar Tikekar: "नितीन आखवे यांनी हे गाणं श्रीधर फडके यांना दिलं आणि..."; आरती अंकलीकर यांनी सांगितला 'मी राधिका' गाण्याचा किस्सा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com