Arati Ankalikar Tikekar: "नितीन आखवे यांनी हे गाणं श्रीधर फडके यांना दिलं आणि..."; आरती अंकलीकर यांनी सांगितला 'मी राधिका' गाण्याचा किस्सा

Arati Ankalikar Tikekar: आरती अंकलीकर यांनी 'मी राधिका' या गीताचा एक किस्सा सांगितला. हे गाणं आरती अंकलीकर यांना कसं मिळालं? हे आरती अंकलीकर यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
Arati Ankalikar Tikekar
Arati Ankalikar Tikekaresakal

Arati Ankalikar Tikekar: शास्त्रीय संगीतक्षेत्रात आपल्या जादूई आवाजानं विशेष स्थान निर्माण करणाऱ्या गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar Tikekar) यांनी 'आमच्या काळी' या सकाळच्या पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर चर्चा केली. अभिनेते अजय पुरकर यांनी आरती अंकलीकर यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच संगीतक्षेत्राबद्दल आरती अंकलीकर यांनी मनमोकळेपणानं सांगितलं. यावेळी आरती अंकलीकर यांनी 'मी राधिका' या गीताचा एक किस्सा सांगितला. हे गाणं आरती अंकलीकर यांना कसं मिळालं? हे आरती अंकलीकर यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

आरती अंकलीकर यांनी सांगितला 'मी राधिका' गाण्याचा किस्सा

आरती अंकलीकर यांच्या 'मी राधिका' या गाण्यानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. सकाळच्या 'आमच्या काळी' या पॉडकास्टमध्ये आरती अंकलीकर यांनी मी राधिका या गाण्याबद्दल सांगितलं, "नेहरु सेंटरमध्ये कौंस के प्रकार नावाचा एक कार्यक्रम होता. कौंस म्हणजे- मालकौंस, चंद्रकौंस इत्यादी. या कार्यक्रमामध्ये नितीन आखवे यांनी मी राधिका हे गाणं श्रीधर फडके यांना दिलं आणि ते गाणं पाहताच श्रीधर फडकेंना वाटलं की, हे गाणं आरतीनेच गायला हवं. "

"कौंस के प्रकार कार्यक्रमानंतर श्रीधर फडके हे मधुकौंस या रागाचा विचार करत होते. मधुकौंस, मी आणि नितीन आखवे यांचे काव्य या सगळ्या गोष्टी मिळून मी राधिका हे गाणं तयार झालं. माझ्यासाठी श्रीधर फडके यांनी हे गाणं तयार केलं आहे. मला डोळ्यासमोर त्यांनी या गाण्याची रचना केली.", असंही आरती अंकलीकर यांनी मुलाखतीत सांगितलं.

Arati Ankalikar Tikekar
Arati Ankalikar Tikekar Podcast : 'फक्त मला पटवण्यापुरता तबला वाजवला, त्यानंतर कधीही....' आरती अंकलीकर अन् अभिनेता उदय काय होती यांची लवस्टोरी?

आरती अंकलीकर टिकेकर यांनी सकाळच्या 'आमच्या काळी' या पॉडकास्टमध्ये त्यांच्या जीवन प्रवासाविषयी सांगितले. तसेच आरती अंकलीकर यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, सांगीतिक प्रवास, अभिनेते उदय टिकेकर यांच्यासोबतच्या कॉलेजमधील आठवणी, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्याकडे शिकतानाचे अनुभव, मुलगी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर, आताच्या काळातील शास्त्रीय संगीत, फ्युजन, सोशल मीडिया या सगळ्याविषयी भरभरून सांगितलं.

पाहा संपूर्ण मुलाखत:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com