Shrirampur: श्रीरामपुरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी केला डान्स, शहरात चड्डी गँगचा धुमाकूळ; फोडले सहा कार्यालये

चोरी केल्यानंतर चोरटे नाचत कारखान्याच्या बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहेत. त्यांच्या अंगावार बनियन, हाफ चड्डी, तोंड पूर्णतः झाकलेले असा पेहराव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Ahmednagar Crime
Ahmednagar Crime Esakal

Thieves Danced After Theft: Shrirampur Crime: येथील एमआयडीसीत शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सहा कारखान्यात चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे ह्या चोरट्यांनी कार्यालयांनाच आपले लक्ष्य केल्याने १ लाख ८७ हजार ५५० रूपयांची रोकड त्यांच्या हाती लागली.चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

शनिवारी एमआयडीसीचा सुटीचा दिवस असतो. त्यामुळे वर्दळ कमी असते. दूध, बेकरी, पशुखाद्य, इलेक्ट्रीकल, फर्निचर यासारखे काही कारखाने सुरू असतात. ही संधी साधत चोरट्यांनी कार्यालयांवर आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले.

केशवकुमार काळे यांच्या केशव प्रोसेसर्सच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजूकडील जाळी कापून आत प्रवेश करून टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेली ९७ हजार ५५० रूपयांची रोकड, अभिजीत कुदळे यांच्या श्री ग्रुप ऑफ इंजस्ट्रीजमधील शटर उचकटून सामानाची उचकापाचक केली.

सागर कुकरेजा यांच्या सूर्या प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या कार्य़ालयातून १५ हजारांची रोकड, कन्हैया कुकरेजा यांच्या प्राइड बेकर्सच्या कार्य़लायात खिडकीतून आत प्रवेश करुन ७५ हजारांची रोकड चोरून नेली.

सतीष चोरडिया यांच्या चंचल केबल्सची कडी कुलूप तोडून सामानाची उचकापाचक केली. किरण काळे यांच्या अमृत अॅग्रोवेट कंपनीतही चोरीचा प्रयत्न केला. प्रणव जठार यांच्या विद्युत शलाका इलेक्ट्रीक कारखान्यात प्रवेश करताच सुरक्षारक्षकाने पाहिल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. एकूण १ लाख ८७ हजार ५५० रूपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली.(Latest Marathi News)

याप्रकरणी केशवकुमार काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक निरीक्षक देविदास चोपडे व कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.

Ahmednagar Crime
Gautam Gambhir : आयपीएल बॉलीवूड, पार्टी याबद्दल नाही तर... शाहरूखच्या संघाला 'गंभीर' इशारा

चोरीनंतर नाच

चोरी केल्यानंतर चोरटे नाचत कारखान्याच्या बाहेर पडल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहेत. त्यांच्या अंगावार बनियन, हाफ चड्डी, तोंड पूर्णतः झाकलेले असा पेहराव असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Marathi News)

Ahmednagar Crime
Anant Ambani Wedding : ''अंबानींनी जेवढा खर्च केलाय तेवढ्यात सगळ्या पाकिस्तानी लोकांचं तीन-चार वेळेस लग्न होईल'', महिला पत्रकाराचं विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com