Shrirampur Fraud: अमिषापोटी पाच कोटींची फसवणूक! श्रीरामपूरमधील प्रकार, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहिन्याला १० ते १५ लाख रुपये नफ्याचे आमिष दाखवत ५ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shrirampur Fraud: अमिषापोटी पाच कोटींची फसवणूक! श्रीरामपूरमधील प्रकार, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Shrirampur 5 Crore Fraud: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहिन्याला १० ते १५ लाख रुपये नफ्याचे आमिष दाखवत ५ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिल बहोद्दिन जहागीरदार, त्याची पत्नी, भाऊ इम्रान बहोद्दिन जहागरदार व वडील बहोद्दिन जहागीरदार (सर्व रा. जामा मशीदमागे, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मुश्ताक बनेमियाँ शेख (रा. डावखर रोड, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

मुश्‍ताक शेख यांचे फर्निचरचे दुकान आणि सॉ-मिलचा व्यवसाय आहे. आर्थिक अडचणीमुळे सॉ-मिल आणि जागेची विक्री त्यांनी केली होती. जहागीरदार यांच्याशी शेख यांची ओळख होती. मिळकत विकून पैसे आल्याची माहिती झाल्याने त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा १० ते १५ लाख रुपये नफा मिळू शकतो.

त्यातून तुमच्या बँकेचे व्याज परस्पर या पैशांतून जाईल, असे आमिष जहागीरदार यांनी दाखवले. शेख यांनी सुरुवातीला १५ लाख रुपये २० फेब्रुवारी २०२३ रोजी दिले. यावेळी आरोपींनी स्टॅम्प पेपरवर करारनामा व पाच लाखांचे तीन धनादेश दिले. तीनच दिवसांत एक लाख रुपये रोख दिले. त्यानंतर शेख यांनी २७ फेब्रुवारी रोजी २० लाख, २४ एप्रिल रोजी ५० लाख रुपये आरोपींच्या बॅंक खात्यावर पाठविले. (Latest Marathi News)

प्रत्येकवेळी आरोपींनी करारनामा करून व धनादेशही लिहून दिले. मात्र, एक रुपयाही शेख यांना दिला नाही. अनेकदा मागणीही केली. पैसे आले की देतो, असे म्हणत वेळ मारून नेली.४ जुलै २०२३ ला शेख हे पैसे मागायला गेले असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वरील चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत.

Shrirampur Fraud: अमिषापोटी पाच कोटींची फसवणूक! श्रीरामपूरमधील प्रकार, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Adani Group: एलआयसीचा मोठा निर्णय! अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे 3,72,78466 शेअर्स विकले

एकूण पाच कोटींची फसवणूक

शेख यांची ८५ लाख, डॉ. अभिमन्यू उमाकांत माकणे (रा. ईश्वर हॉस्पिटल, पढेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांची ३ कोटी २० लाख ५८ हजार, आतिफ कूर रहेमान अब्दुल करीम शेख (श्रीरामपूर) यांची १७ लाख ५० हजार, असरार आसिफ शेख (श्रीरामपूर) यांची १२ लाख ५० हजार आणि तौसिफ बालम पठाण (श्रीरामपूर) यांची २० लाख असे एकूण ५ कोटी ८ लाख रुपयांची जहागीरदार कुटुंबाने फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. (Latest Marathi News)

Shrirampur Fraud: अमिषापोटी पाच कोटींची फसवणूक! श्रीरामपूरमधील प्रकार, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
आंध्र प्रदेशमध्ये भाऊ-बहीण आमने-सामने! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वायएस शर्मिला; कोण आहेत त्या?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com