esakal | घरफोड्या करणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar two members of a burglary gang have been arrested by a team from the local criminal investigation branch

शहर व परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

घरफोड्या करणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहर व परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. घरफोड्या करणारे पाचही आरोपी सख्खे भाऊ असून, नगर व पारनेर तालुक्‍यांत त्यांनी पाच घरफोड्या व एक रस्तालूट केल्याचे निष्पन्न झाले.

चोरीच्या वाहनांच्या खरेदी-विक्रिचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय; पोलिसांची मात्र डोळेझाक
 
घरफोडीतील सोने विकण्यासाठी आरोपी भगवान ईश्‍वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत) हा शिरूर कासार (जि. बीड) येथील सराफाकडे जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने कडा-शिरूर कासार रस्त्यावर सापळा रचला. भगवान व त्याचा भाऊ संदीप भोसले हे शिरूरकडे येताना दिसताच पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, दुचाकी सोडून संदीप भोसले पळाला. पोलिसांनी पाठलाग करून भगवान भोसलेला पकडले. त्याच्याकडे चार लाख 56 हजार रुपये किंमतीचे नऊ तोळे सोने सापडले.

चौकशीत त्याने घरफोड्यांची कबुली दिली. चोरीचे सोने त्याने पाडळी (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथील सराफ रामा अभिमन्यू इंगळे (वय 33) यास विकल्याचे सांगितले. इंगळे याच्या दुकानातून 7 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 16 तोळे दागिने हस्तगत करण्यात आले. भगवान भोसले याला घरफोडीत त्याचे सख्खे चार भाऊ संदीप, मिलन, अटल्या, मटक भोसले मदत करीत होते. 

आंबटशौकिनांसाठी दारूविक्री सुरू; दारूविक्रीच्या निषेधार्थ महिला नेत्याचे अनोखे आंदोलन

वडगाव तांदळी येथील रिमा वालचंद धाडगे यांच्या घरातून आरोपींनी 27 जानेवारी रोजी 72 हजारांचा ऐवज चोरला होता. हिंगणगाव (ता. नगर) येथील भाऊसाहेब दगडू ढगे यांच्या घरातून 16 फेब्रुवारीला चोरी केली होती. नगर तालुका हद्दीत तीन, पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

loading image