esakal | चोरीच्या वाहनांच्या खरेदी-विक्रिचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय; पोलिसांची मात्र डोळेझाक
sakal

बोलून बातमी शोधा

Theft of two-wheelers has increased in Shevgaon in the last few years.jpg

दुचाकी व चारचाकी वाहनांची चोरी, विक्री व सुटया भागांची मोडतोड करुन अवैधरीत्या विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरु असूनही पोलीसांची मात्र त्याकडे रितसर डोळेझाक होत आहे.

चोरीच्या वाहनांच्या खरेदी-विक्रिचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय; पोलिसांची मात्र डोळेझाक

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : चोरीच्या व जुन्या वाहनांची खरेदी करुन त्यांची मोडतोड करुन सुटे भाग भंगारात विकण्याचा धंदा शेवगाव शहरात तेजीत सुरु आहे. वाहन चोरीचे व त्याच्या खरेदी विक्रीचे मोठे रँकेट शहरात सक्रीय असल्याने राज्यासह इतर राज्यातूनही चोरी झालेल्या वाहनांचे खरेदी विक्रीचे व्यवहार सर्रास सुरु असून त्यामध्ये मोठी साखळी कार्यरत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची चोरी, विक्री व सुटया भागांची मोडतोड करुन अवैधरीत्या विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरु असूनही पोलीसांची मात्र त्याकडे रितसर डोळेझाक होत आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
शहरात व तालुक्यात गेल्या काही वर्षापासून दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रमुख चौकातून व दुकानासमोरुन पार्कींग केलेल्या गाडया भरदिवसा चोरीला जात असूनही त्याचा तपास लागत नाही. याबाबत रितसर तक्रार करुनही हाती काही लागत नसल्याने अनेक जण त्याचा नाद सोडून गैरसोय टाळण्यासाठी दुसरी दुचाकी खरेदी करतात. ठराविक कंपन्यांच्या ठराविक दुचाक्या यावर चोरटयांचे विशेष लक्ष असल्याने चोरीनंतर गायब झालेली दुचाकी शहरातील गोडाऊनमध्ये अवघ्या काही क्षणात तोडली जाते.

महिलेचा विनयभंग केल्यामुळे डॉक्‍टरला अटक

गाडीच्या  किंमतीएवढे पैसे तोडलेल्या सुट्टया भागांच्या व भंगारात विकलेल्या लोखंडातून मिळतात. शिवाय गाडीचा चेसी नंबर, इंजिन नंबर व नोंदणी क्रमांक गायब झाल्याने पोलिस तपासाची व कायदेशीर कारवाईची काहीही झंजट राहात नाही. त्यामुळे चोरीच्या वाहनांच्या तोडलेल्या सुटया भागांची विक्री करण्याचे परस्परपूरक व्यवसाय येथे सुरु झाले आहेत. शेवगाव मराठवाडयाच्या सरहद्दीला लागून असल्याने शेजारच्या बीड, औरंगाबाद, जालना या भागासह राज्यातील इतर शहरातून चोरी झालेली वाहनेही रातोरात येथे आणून तोडली जातात. सुरुवातीला चोरीच्या दुचाकी पुरता मर्यादीत असलेल्या या व्यवसायाने आता मोठे स्वरुप धारण केले असून चोरीची चारचाकी वाहने खरेदी करुन ते तोडण्याचा व्यवसायही सुरु झाला आहे. 

पैशांच्या वादातून चौकातच तरुणाचा खून

मागील आठवडयात ठाणे जिल्हयातील अंबरनाथ येथून चोरी झालेली स्कुलबस शहरानजीक नेवासा रस्त्यावर पोलीसांनी पकडली. मात्र ती बस चोरीनंतर शेवगावमध्ये का आणण्यात आली होती. याचे गौडबंगाल या वाहनांच्या तोडफोड करुन सुटया स्वरुपात विकण्याच्या व्यवसायात आढळून येते. यापूर्वीही पुणे, ठाणे, मुंबई, कल्याण या मोठया शहरातून चोरी झालेल्या चारचाकी वाहनांच्या तपासाकामी तेथील पोलीसांनी शहरातील काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यातून काय निष्पन्न झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या मागील गौडबंगाल कळू शकले नाही. येथील व्यावसायिकांचे वाहन चोरीच्या रँकेटशी असलेले संबंध लक्षात घेता याची पाळेमुळे पोलीसांनी खणून काढण्याची गरज आहे. वरवरची जुजबी कारवाई करुन पोलीस या व्यवसायाच्या मुळाशी जायला तयार नाहीत. त्यामुळे पोलीसांच्या भुमिकेवरही शंका निर्माण होत आहे. चोरीच्या दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री व अशा पध्दतीने तोडफोड करुन विक्रीचे व्यवहार सर्रास होत असतांना पोलीसांची भुमिका मात्र संशयास्पद आहे.
 
शेवगाव येथील विजय धनवडे म्हणाले, शहरातील नेवासे रस्त्यावरुन नोव्हेंबर महिन्यात चोरीला गेलेल्या दुचाकीची रितसर तक्रार देवूनही चारपाच महिन्यात काहीही निष्पन्न झालेले नाही. मात्र त्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करुन मानसिक वैताग झाला. 

अंबरनाथ येथून आणलेली बस शहरात पकडली असली तरी चोरटयांना मात्र पोलीस पकडू शकले नाहीत. सर्व रितसर माहिती मिळूनही पोलीसांना सुगावा न लागता चोरटे नेमके कसे पसार झाले. की पोलीसांनीच त्यांना त्यासाठी मदत केली. याबाबतची चर्चा शहरात सुरु आहे. 
 

loading image