Ahmednagar : वैभव वाघ, शबाना शेख, विक्रम भगत आदर्श शिक्षक

समाधान भाले आदर्श कर्मचारी; स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पुरस्कारांचे आज वितरण
Ahmednagar
Ahmednagar sakal

Nagar News - जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये समावेश झालेल्या स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मंगळवारी (ता.५) स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एमआयडीसी या ठिकाणी सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण होईल.

यावर्षी इंदिरा शामकांत मोरे पुरस्कृत स्व. शोभा महादेव कुलकर्णी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेतील प्राथमिक शिक्षक वैभव भगवान वाघ, स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्राथमिक शिक्षक शबाना ताज शेख व बालभवनचे शिक्षण समन्वयक विक्रम सुधाकर भगत यांची निवड करण्यात आली.

Ahmednagar
Dr M S Gosawi Death : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन
Ahmednagar
Mumbai News : सावित्रीबाई फुले नाट्यगृह व्‍यवस्‍थापकाची उचलबांगडी,तिथेही टिकाव नाही...

स्व. प्रा. गोपालभाई गुजर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्‍या आदर्श कर्मचारी पुरस्कारासाठी स्नेहालय संस्थेतील वरिष्ठ लेखापाल समाधान तुकाराम भाले यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अध्यापक मकरंद विष्णू खेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

Ahmednagar
Sola Somvar Vrat: निज श्रावणात सोळा सोमवार व्रत प्रारंभ! अधिक मासात व्रतास निर्बंध, 14 वर्ष केले जाते व्रत

संस्थेचे विश्वस्त पालक किरीटी मोरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण केले जाणार असल्याचे निवड समितीचे सदस्य व स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, शाळेचे संचालक राजेंद्र शुक्रे, संचालक हनिफ शेख व मुख्याध्यापिका क्षितिजा हडप यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा व शहरातील शिक्षक व नागरिकांनी पुरस्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे व सचिव राजीव गुजर यांनी केले आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com