Nilwande Dam : ५३ वर्षाची प्रतीक्षा संपली; १८२ गावांतील मंदिरांत जलाभिषेक करणार

निळवंडे धरणातील पाण्याची वाट पाहत तिसऱ्या पिढीने चाळिशी पार केली. त्रेपन्न वर्षे लाभक्षेत्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची अक्षरशः ससेहोलपट झाली
कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे
कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडेsakal

शिर्डी : निळवंडे धरणातील पाण्याची वाट पाहत तिसऱ्या पिढीने चाळिशी पार केली. त्रेपन्न वर्षे लाभक्षेत्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची अक्षरशः ससेहोलपट झाली. गेल्या दहा वर्षांपासून या धरणात साठणारे पाणी बागायत भागासाठी अतिरिक्त म्हणून वापरले जाते.

त्रेपन्न वर्षांनंतर पहिल्यांदाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दुष्काळी भागासाठी डाव्या कालव्यात चाचणीसाठी पाणी सोडण्यात आले.

कालव्यात आलेल्या पाण्याने, निळवंडे कृती समितीच्या वतीने लाभक्षेत्रातील १८२ गावांतील महादेव व ग्रामदैवतांना जलाभिषेक केला जाईल, अशी घोषणा मंगळवारी या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या निळवंडे कृती समितीच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली.

कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे
Ahmednagar : पुण्याचे काम करायला भाग्य लागते ; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे

त्रेपन्न वर्षांनंतर कालव्यात पाणी सोडले जाणार असल्याने, आज या पाण्यासाठी गेल्या तेवीस वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या निळवंडे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व दुष्काळी टापूतील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येथे जल्लोष केला. लोखंडे यांच्या हस्ते कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, सचिव राजेंद्र सोनावणे, दत्ता भालेराव, राजेंद्र सोनावणे, शिवाजी शेळके, सर्जेराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड, अण्णासाहेब वाघे, बाळासाहेब रहाणे, सौरभ शेळके, विलास गुळवे, सुखलाल गांगवे व नीलेश शेळके आदी उपस्थित होते.

कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे
Ahmednagar : चौंडीला भेट देणारे शिंदे ठरणार चौथे मुख्यमंत्री

यावेळी बोलताना कृती समितीचे अध्यक्ष शेळके म्हणाले, की गेल्या तेवीस वर्षांपासून आम्ही या पाण्यासाठी संघर्ष केला. खासदार लोखंडे यांनी आम्हाला मनापासून साथ दिली. त्यांच्याच पुढाकारातून जलदिंडी आणि आझाद मैदानावरचे उपोषण आदी आंदोलने केली. केंद्रात आणि राज्यातल्या मंत्र्यांना त्यांनीच आम्हाला सोबत घेऊन साकडे घातले.

कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे
Ahmednagar : अहमदनगर लोकसभेबाबत राष्ट्रवादीची चर्चा; नीलेश लंके यांच्यासोबत फाळके, जगताप, शेलारांचे नाव

जल आयोगाच्या मान्यता मिळविल्या. त्यामुळे निधीची तरतूद करण्याचा मार्ग खुला झाला. आम्ही पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या आणि आमच्यावर बरेच गुन्हेदेखील दाखल झाले. कालव्यात पाणी सुटले, की आमच्या संघर्षाच्या पहिल्या टप्प्याला यश आले, असे म्हणावे लागेल.

कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे
Solapur : यल्लम्मा, नाऊ यान पाप माडीद्याऊ..; आईच्या टाहोनं गहिवरलं गाव, एकाच चितेवर चौघांवर अंत्यसंस्कार

तेवीस वर्षांच्या संघर्षाचे सार्थक झाले. ज्यांनी ज्यांनी निळवंडे व्हावे, यासाठी पुढाकार घेतला, त्या खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांचे आणि मंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत. मात्र, थेट शेतात पाणी येईल तो दिवस आमच्या भाग्याचा असेल.

- नानासाहेब शेळके, अध्यक्ष, निळवंडे कृती समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com