
राहुरी : आजोळचे घरोब्याचे, जिव्हाळ्याचे, आपलेपणाचे संबंध आहेत. ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्याच प्रेमापोटी, आपलेपणापोटी आलो आहे. आपण तेवढ्याच आपलेपणाने माझे आदरातिथ्य, स्वागत केले. त्याने भारावून गेलो. असेच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपण एकमेकांवर ठेवूया अन् पुढची वाटचाल करूया. मी कालही काम करत होतो, आजही करीत आहे, उद्याही काम करत राहणार आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.