राहुरी : तालुक्यातील विविध संस्थांचे अनेक विद्यमान व माजी पदाधिकाऱ्यांनी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुरीतील देवळाली प्रवरा माझे आजोळ आहे. त्यामुळे तालुक्याविषयी ममत्वभाव आहे. तालुक्यातील प्रश्नांवर लक्ष देऊ, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.