अकोले नगरपंचायत निवडणुकीत 91 उमेदवारांचे अर्ज वैध तर २८ अवैध

Election
Election Esakal

अकोले (जि. अहमदनगर) : अकोले नगरपंचायत निवडणुकीत १३ प्रभागातून ९१ उमेदवारांचे अर्ज वैध रित्या प्राप्त झाले असुन २८ अर्ज अवैध ठरले आहे तर ओ.बी.सी आरक्षण स्थगित प्रभागातील १९ अर्ज बाजूला ठेवण्यात आले आहे.

२८ अर्ज अवैध

अकोले नगरपंचायत निवडणूकीत आज छाननी प्रक्रिया सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालयात झाली, यावेळी निवडणूक आधिकारी श्री. उदय किसवे, सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री. विक्रम जगदाळे यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल एकुण १३८ अर्जातुन ओ.बी.सी आरक्षणाचे चार स्थगित निवडणूक प्रभागातील दाखल १९ उमेदवारांचे अर्ज निवडणूक होत नसल्याने अधिकाऱ्यांनी बाजूला काढले. उरलेले १३ प्रभागातील ११९ दाखल अर्जांची छाननी करण्यात आली यात २८ उमेदवारांचे अर्ज चुकांमुळे अवैध ठरले तर ९१ उमेदवारांचे अर्ज वैधरित्या प्राप्त झाले आहे. यावेळी अवैध ठरलेल्या बहुतांश अर्जांमध्ये राजकीय पक्षांकडून अर्ज भरलेत मात्र ज्यांनी पक्षाचे ए.बी फॅार्म जमा केले नाही अशा व्यक्तीचे व दोन अर्ज दाखल केलेल्याचा एक अर्ज अवैध ठरविण्यात आले. बहुचर्चीत प्रभाग सहा मधून जगताप अलका संजय यांचा अर्ज सुचक डबल असल्याकारणाने अवैध ठरविण्यात आला असे एकुण २८ अर्ज अवैध झाले तर ९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

Election
कर्तव्य बजावतांना वन कर्मचारी शहीद | Ahmednagar

१३ प्रभागातील वैध ठरलेल्या ९१ उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे -

प्रभाग १ मधून एकुण (४ वैध)

१) मंडलिक अलका अशोक २) मंडलिक विमल संतु ३) मंडलिक शोभा मच्छिंद्र ४) मंडलिक सुरेखा पुंजा

प्रभाग २ मधून ५ अर्ज वैध

१) चाैधरी रमेश माधव २) चाैधरी रामहारी भाऊसाहेब ३) चाैधरी शिवाजी आनंदा ४) चाैधरी सागर निवृत्ती ५) चाैधरी सागर विनायक

प्रभाग ३ मधून एकुण ५ वैध अर्ज दाखल

१) आभाळे उर्मिला अरुण २) नवले जयश्री दत्तात्रय ३) पांडे मंदा तानाजी ४) मनकर प्रतिभा वसंत ५) पांडे छबुबाई पोपट

प्रभाग ५ मधून ५ अर्ज वैध

१) कानवडे गणेश भागुजी २) गुजर हर्षल रमेश ३)दराडे हेमंत भिकाजी ४) नाईकवाडी अमित सखाराम ५) नाईकवाडी सोनाली लक्ष्मीकांत

प्रभाग ६ मधून एकुण ३ वैध अर्ज

१) घोडके शैला विश्वनाथ २) रुपवते कांचन किशोर ३) रुपवते श्वेताली मिलिंद

प्रभाग ७ मधून एकुण ४ अर्ज वैध

१) ताजणे सचिन सदाशिव २) शेख आरीफ शमसुद्दीन ३) शेख मुश्ताक दस्तगिर ४) शेख मैनुद्दीन बद्रुद्दीन

प्रभाग ८ मधुन एकुण ५ वैध अर्ज

१) गायकवाड अशोक दत्तु २) गायकवाड जयराम विठोबा ३) गायकवाड नवनाथ कारभारी ४) गायकवाड योगेश रामनाथ ५) वडजे बाळासाहेब काशिनाथ

प्रभाग ९ मधुन एकुण ३ अर्ज वैध

१) मालुंजकर मंगल विलास २) रोकडे भिमा बबन ३) वैद्य शितल अमोल

प्रभाग १० मधुन एकुण ८ अर्ज वैध

१) नाईकवाडी अनिल गंगाधर २) नाईकवाडी नितिन सुरेश ३) नाईकवाडी प्रकाश संपत ४) शेटे नवनाथ विठ्ठल ५) शेटे मयुर नामदेव ६) शेटे शिवाजी विठ्ठल ७) शेटे संदेश बादशहा ८) शेणकर संदिप भाऊसाहेब

प्रभाग १२ मधुन एकुण ६ अर्ज वैध

१) कुरेशी निलोफर गफ्फार २) सुमन सुरेश जाधव ३) पवार अनीता शरद ४) शिंदे पुनम सुरेश ५) शेख तमन्ना मोसिन ६) साळुंके मंदा सोमनाथ

Election
Ahmednagar | जिल्ह्यात धावल्या 36 बस, संपामुळे 15 कोटींचा फटका

प्रभाग १५ मधुन ५ अर्ज वैध

१) नाईकवाडी अमोल बाळासाहेब २) नाईकवाडी प्रदीप बाळासाहेब ३) नाईकवाडी संतोष कारभारी ४) वर्पे अजय भिमराज ५) शेटे सचिन संदिप

प्रभाग १६ मधुन ४ अर्ज वैध

१) भांगरे पूजा तुकाराम २) भांगरे पुष्पा शरद ३) भांगरे मिना प्रकाश ४) शेणकर माधुरी रवींद्र

प्रभाग १७ मधुन एकुण ४ अर्ज वैध

१) नाईकवाडी दर्शना सुभाष २) पानसरे आशा रविद्र ३) पानसरे कविता संपत ४) शेळके कविता परशुराम

अश्या प्रकारे १३ प्रभागातून एकुण ९१ उमेदवारांचे अर्ज वैधरित्या प्राप्त झाले असुन येत्या १३ डिसेंबर पर्यंत माघारिची मुदत आहे. १३ डिसेंबर २०२१ नंतर निवडणूकीची खरी रंगत सुरु होऊन प्रचाराला सुरुवात होणार असल्याने आता कोण माघार घेणार व कोण निवडणुकीच्या रिंगणात लढणार हे १३ डिसेंबर नंतरच कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com