अहमदनगर : अकोले, पाथर्डीतील बस बंदच

जिल्ह्यातील अकरापैकी नऊ आगारांतील बसमुळे प्रवाशांना दिलासा
ST Bus
ST Bus esakal

अहमदनगर : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा(ST Employee) मागील अडीच महिन्यांपासून संप सुरू आहे. या कालावधीत अकोले व पाथर्डी आगारांतून अद्याप एकही बस (Bus)धावलेली नाही. जिल्‍ह्यातील ११ आगारांपैकी सध्या नऊ आगारांतून थोड्याफार प्रमाणात बस सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय टळत आहे.

ST Bus
नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अनिश्चिततेचे ढग

मागील अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजअखेर एसटीचे एक हजार २६९ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही बसस्थानकांतून खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटका आगामी काळात एसटीला बसणार आहे. संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाला सुमारे ४० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

ST Bus
वर्धा : अवैध गर्भपात प्रकरणात पती झाला सहआरोपी

सध्या जिल्ह्यात नऊ आगारांतून १२० बसच्या माध्यमातून जिल्ह्यासह जिल्ह्या बाहेरील प्रवाशांना सुविधा पुरविली जात आहे. १२० बसच्या माध्यमातून दैनंदिन २५० फेऱ्या होत आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बसची संख्या वाढू लागल्याने खासगी वाहतूकदारांचे धाबे दणाणले असून, अव्वाच्या सव्वा भाडे आकरणी आता बंद होऊ लागलेली आहे.

दृष्टीक्षेपात

  • एकूण कर्मचारी - तीन हजार ८८५

  • कामावर हजर झालेले कर्मचारी - एक हजार २६९

  • आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी - दोन हजार ४७५

  • रजेवर असलेले कर्मचारी - १४१

  • एकूण आगारे - ११ एकूण बस - ५३० सध्या सुरू बस - १०८

या आगारांतून धावतात बस : शेवगाव, तारकपूर, कोपरगाव, नेवासे, श्रीरामपूर, जामखेड, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदे.(Ahmednagar News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com