

Alandi Yatra 2025: Thousands of devotees queue up as over 1,000 special bus trips ensure smooth travel.
Sakal
अहिल्यानगर : जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा तसेच कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागातर्फे सर्वच तालुक्यातून जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त विभागाने दररोज ५४ बसेसची व्यवस्था केली होती. या माध्यमातून दररोज २०४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. १३ ते १७ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या यात्रा कालावधीत एसटीला १९ लाख ३२ हजार ९५७ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी दिली.