रुग्णवाहिकेच्या चालकांची सेवा ठरतेय अनमोल

रुग्णवाहिकेच्या चालकांची सेवा ठरतेय अनमोल
Summary

एकशे आठ रुग्णवाहिकेवरील चालकांची अहोरात्र सुरु असलेली सेवा अनेक रुग्णांसाठी अनमोल ठरत आहे.

राशीन (अहमदनगर) : गेली दीड वर्षांपासून कोरोनाच्या (Corona) जीवघेण्या प्रादुर्भावाने कहर केल्याने माणसातली माणुसकी आणि नातेसंबंधातला गोडवा संपवला, कोरोना झालाय म्हणताच जवळची माणसं आपल्या जीवाच्या भीतीने दूर पळत आहेत. कोरोनाने मृत पावलेल्या अनेकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास चक्क पोटच्या मुला-मुलींनीच नकार दिला, अशा अनेक घटना दररोज आपण पाहत आहोत आणि ऐकत आहोत. (ambulance drivers santosh kotkar and datta jadhav are working day and night at rashin primary health center)

रुग्णवाहिकेच्या चालकांची सेवा ठरतेय अनमोल
कर्जत, राशीन स्टँडवरील चोऱ्यांचा झाला उलगडा

कोरोना साथीच्या आजाराच्या काळात कोरोना आणि इतर आजारांच्या अत्यवस्थ रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यात एकशे आठ रुग्णवाहिकेवरील चालकांची अहोरात्र सुरु असलेली सेवा अनेक रुग्णांसाठी अनमोल ठरत आहे. यामध्ये राशीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवरील चालक संतोष कोतकर व दत्ता जाधव यांचा पुढाकार मोठा आहे.

रुग्णवाहिकेच्या चालकांची सेवा ठरतेय अनमोल
राशीन परिसरात मुसळधार पावसाचे थैमान; दूध उत्पादनावर परिणाम

कोरोनाची साथ आल्यापासून राशीनची रुग्णवाहिका कर्जतच्या कोव्हिड केंद्रासाठी राखीव करण्यात आली. तसे हे दोन्ही चालक कोरोनाच्या रुग्णांसाठी दिवस-रात्र सेवा देत आहेत. तालुक्‍याच्या विविध भागात बाधित झालेल्या रुग्णांना कोव्हिड उपचार केंद्रावर घेऊन जाणे, तेथे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना नगर, बारामती, भिगवण अशा ठिकाणी पुढील उपचारासाठी रात्री बे रात्री घेऊन जाण्याचे महत्वाचे काम रुग्णवाहिका चालक करीत आहेत.

रुग्णवाहिकेच्या चालकांची सेवा ठरतेय अनमोल
माहिती लपवल्यानेच राशीन चालले जामखेडच्या वाटेवर...एकाच कुटुंबातील तिघे बाधित

कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी नेताना नातेवाईक हात लावण्यास तयार नसतात, मात्र हे दोन्ही चालक जीवाची पर्वा न करता अशा रुग्णांना रुग्णवाहिकेत झोपवणे, त्यांना ऑक्‍सिजन जोडणे, पुन्हा रुग्णास उतरविणे अशी कामे विनातक्रार करीत राहतात. राशीन व कुळधरण जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील रुग्णांना या चालकांनी तातडीची रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करुन दिल्याने अनेकांना जिवदान मिळाले आहे.

रुग्णवाहिकेच्या चालकांची सेवा ठरतेय अनमोल
राशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

त्यांचीही भूमिका महत्वाची

108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा मिळविण्यासाठी प्रथमत: 108 च्या टीमला कॉल करणे, वेळप्रसंगी वरिष्ठांशी बोलून घटनेचे गांभीर्य समजावून सांगितल्यानंतर ही रुग्णवाहिका डिस्पॅच होते. मात्र ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांना ही बाब लक्षात येत नसल्याने अनेक रुग्णांसाठी 108 ला कॉल करून रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहचविण्याचे काम देशमुखवाडीचे माजी उपसरपंच मालोजी भिताडे हे स्वयंप्रेरणेने करीत आहेत. अत्यवस्थ व गरजू रुग्णांना 108 रुग्णवाहिकेची सेवा मिळवून देण्यात भिताडे यांची भूमिका महत्वाची ठरतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com