अण्णांची राळेगण सिद्धीबाबत भूमिका ः अगोदर बिनविरोधसाठी प्रयत्न, आता निवडणुकीचे स्वागत

एकनाथ भालेकर
Friday, 8 January 2021

इंग्रजांच्या हुकूमशाहीला लोक कंटाळले होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून लोकशाही अस्तित्वात आली असून त्यांच्या त्यागाची जाणीव कार्यकर्ते व सर्व मतदारांनी ठेवली पाहिजे.

राळेगणसिद्धी : आम्ही लोकशाही स्वीकारली असल्याने लोकशाहीत प्रत्येक मतदाराला निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदानाचा मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. निवडणूक होणे हा दोष नाही आणि निवडणूक लढवणेपण दोष नाही.

फक्त निवडणुकीतील दोष बाजूला करणे गरजेचे आहे. निवडणुकीत भांडणे, हाणामा-या न होता शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने निवडणूक होणे महत्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - लष्कराच्या नगरमधील स्थळाचे स्थलांतर

राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हजारे ई सकाळशी बोलताना हजारे म्हणाले की, सन 1857 ते 1947 या नव्वद वर्षांच्या काळात भारतात लोकशाहीसाठी लोकांनी संघर्ष केला आहे. काही लोक फासावर गेले, काहींना तुरूंगवास झाला तर काही भूमिगत झाले.

इंग्रजांच्या हुकूमशाहीला लोक कंटाळले होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून लोकशाही अस्तित्वात आली असून त्यांच्या त्यागाची जाणीव कार्यकर्ते व सर्व मतदारांनी ठेवली पाहिजे. निवडणुकीत फक्त मटण व दारू नको. निवडणुकीत दारू मटणाच्या अमिषाला बळी पडलेली तरूण पिढी व्यसनी होऊन त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतात. हा दोष दूर केला पाहिजे.

 

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गट-तट, राजकीय संघर्षाचे लोण पाच वर्ष राहते. दोन गटांत होणारे मतभेद, कटूता टाळण्यासाठी ग्रामविकासासाठी एकजूट होण्यासाठी बिनविरोध निवडणुकांना आपण पाठिंबा दिला होता. राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. 
- अण्णासाहेब हजारे, जेष्ठ समाजसेवक
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna expressed her views on Ralegan Siddhi