

Ralegan Siddhi Talks Fail, Anna Hazare Slams Changes in RTI Act, Plans Protest
sakal
पारनेर : सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेल्या मनमानी दुरुस्त्यांमुळे हा कायदा जनहिताच्या दृष्टीने कमकुवत झाला आहे. याविरोधात आता राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यात चर्चा झाली. बैठकीत हजारे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारबरोबर बैठक होणार आहे. सकारात्मक निर्णय झाला नाही, तर उपोषणावर ठाम असल्याची माहिती हजारे यांनी दिली.