नगर जिल्ह्यात १०४ कोरोना रूग्ण

Another corona patient in nagar
Another corona patient in nagar

नगर ः जिल्ह्यात आज आणखी चार कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात घाटकोपरहून पिंपळगाव खांड (अकोले) येथे आलेले वडील व मुलगी आणि नेवासे व श्रीगोंदे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 104 वर पोचला आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना बूथ हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरानामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 58 झाली आहे. 

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी व संगमनेरमधील प्रत्येकी एक, तर सारसनगर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. बुथ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना निरोप दिला. जिल्ह्यात आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. निघोज, कोपरगाव, जामखेड, श्रीरामपूर, नगर, राशीन येथील प्रत्येकी एक, तर निमोण, संगमनेर प्रत्येकी दोन रुग्णांचा त्यात समावेश आहे. 

पॉझिटिव्ह महिलेने दिला जुळ्यांना जन्म 
मुंबईहून निंबळक येथे आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या महिलेने आज जिल्हा रुग्णालयात दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यात एक मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही बाळांची व मातेची प्रकृती ठणठणीत आहे. दोन्ही बाळांचे वजन प्रत्येकी दोन किलो आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. 
 
कोरोना मीटर 
2239 व्यक्तींची तपासणी 
104 पॉझिटिव्ह 
2041 निगेटिव्ह 
151 निरीक्षणाखाली 
962 होम क्वारंटाईन 
56 अहवाल येणे बाकी 
58 रुग्णांना डिस्चार्ज 
10 जणांचा मृत्यू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com