
महापालिका क्षेत्रात तीन शाखांना कार्य करता येईल, असा नाट्यपरिषदेचा नियम आहे. त्यानुसार शहरातील युवा कलाकार, नाट्यरसिकांनी या शाखेसाठी मागणी केली होती. जिल्ह्यातील नाट्यचळवळ मागील अनेक वर्षांपासून बहरत आहे.
अहमदनगर : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारी समितीची बैठक मुंबईत बुधवारी झाली. तिथे नगर शहरात नाट्यपरिषदेची दुसरी शाखा उघडण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार 'अहमदनगर महानगर' या नवीन शाखेस मान्यता दिली असून, तसे पत्र मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी दिल्याची माहिती नाट्यकर्मी क्षितिज झावरे यांनी दिली. यापूर्वी नाट्यपरिषदेची नगर जिल्हा शाखा कार्यरत आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
महापालिका क्षेत्रात तीन शाखांना कार्य करता येईल, असा नाट्यपरिषदेचा नियम आहे. त्यानुसार शहरातील युवा कलाकार, नाट्यरसिकांनी या शाखेसाठी मागणी केली होती. जिल्ह्यातील नाट्यचळवळ मागील अनेक वर्षांपासून बहरत आहे. राज्य नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा, गणपती व नवरात्रातील व्यावसायिक नाट्यप्रयोग, विविध नाट्यप्रशिक्षण शिबिरे व नाट्यविषयक उपक्रमांसह चित्रपटनिर्मिती, मालिकानिर्मिती नगर शहरात होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या उपक्रमांतून अनेक युवा कलाकार शहरात निर्माण होत आहेत. शहरातील रसिकवर्गसुद्धा वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील 220 नाट्यरसिकांनी एकत्र येऊन या शाखेची मागणी केली होती. या विनंतीला अध्यक्ष प्रसाद कांबळे आणि मध्यवर्ती कार्यकारी समितीने मान्यता देऊन संक्रांतीनिमित्त गोड भेटच दिली आहे. नवीन शाखेची अस्थायी कार्यकारी समिती लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या सभेनंतर अभय गोले यांच्या नावे हे मंजुरीचे पत्र संजय लोळगे यांना देण्यात आले.
नवीन पिढीचे प्रतिनिधी नवीन संकल्पना राबवीत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. आम्ही त्यांना वेगळे समजत नाही. त्यांना आम्ही सहकार्यच करू.
- शशिकांत नजान, संस्थापक कार्याध्यक्ष, नगर जिल्हा शाखा, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदमराठी नाट्यपरिषदेची दुसरी शाखा नगरमध्ये सुरू होत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यावरून नगरमधील सांस्कृतिक व नाट्यचळवळीची व्याप्ती वाढत असून, नगरसाठी ही भूषणावह बाब आहे.
- पी. डी. कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी