esakal | अरूणकाकांनी डाव टाकताच श्रीगोंद्याचे राजकारण फिरले, पाचपुतेही ठरले फेल
sakal

बोलून बातमी शोधा

Arun Jagtap of Shrigonda taluka turned politics around

एकाचवेळी आघाडीचे हे दोन दिग्गज बिनविरोध झाल्याने तालुक्यातील सहकारावर पुन्हा एकदा या दोन कारखानदार कुटूंबांचे वर्चस्व स्थापित झाले आहे.

अरूणकाकांनी डाव टाकताच श्रीगोंद्याचे राजकारण फिरले, पाचपुतेही ठरले फेल

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : नगर जिल्ह्यातील राजकारण भल्याभल्यांना उमगणार नाही. त्यातल्या त्यात सहकारातील तडजोडी कोणालाही कळणार नाहीत. आता हेच बघा, श्रीगोंदा तालुक्यातून माजी आमदार राहुल जगताप आणि काँग्रेस नेत्या अनुराधाताई नागवडे जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून गेल्या आहेत. 

एकाचवेळी आघाडीचे हे दोन दिग्गज बिनविरोध झाल्याने तालुक्यातील सहकारावर पुन्हा एकदा या दोन कारखानदार कुटूंबांचे वर्चस्व स्थापित झाले आहे.

जगताप आमदारकीच्या निवडणूकीत थांबले मात्र जिल्हा सहकारी बँकेत जाण्यासाठी बड्या-बड्यांना ताकत लावावी लागते तरीही यश मिळत नाही त्याच बँकेच्या राजकारणात श्रीगोंद्यातून सगळा विरोध मूठीत गुंडाळत थेट बिनविरोध जाण्याची किमया साधल्याने  सहकारातील जाणत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या.  

हेही वाचा - महाविकास आघाडीने पलटवली बाजी, भाजपचे स्वप्न विरले

जगताप यांना बँकेत जावू न देण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते गटाने मोठी व्यूहरचना केली होती. विद्यमान संचालक दत्तात्रेय पानसरे यांनी बँकेत जाण्याची पुर्ण तयारी केली होती. तालुक्यातील १६८ सेवा संस्था मतदार आहेत. त्यांचे ठराव करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठी यंत्रणा लागली होती.  शेवटी जगताप भारी ठरले आणि पानसरे यांनी या मतदारसंघात अर्जच न भरता माघार घेतली.

काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांनी ठरल्याप्रमाणे माघार घेतल्याने पाचपुते गट निवडणूक कशी करणार याची उत्सुकता होती. या मतदारसंघात तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रवीण कुरुमकर व बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष वैभव पाचपुते यांचे अर्ज होते. त्यातील पाचपुते यांनी सकाळीच माघार घेत जगताप यांना पाठींबा दिला. दुपारी कुरुमकर हे तर  त्यांच्या नेत्यांना चकवा देत बैठकीतून थेट जगताप यांच्या वाहनात येवून बसले.

यात बाजार समिती संचालक बाळासाहेब नाहाटा यांनी महत्वाची भुमिका बजावली. त्यामुळे सगळेच चक्रावले. कुरुमकरांना माघारीपासून थांबविण्याचा मोठा प्रयत्नही झाला.  कुरुमकर हे निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत नसल्याने त्यांनी माघार घेत जगताप यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा केला.

पाचपुते गटाला धक्का

राहूल जगताप यांचे वडील कुंडलिकराव जगताप हे बँकेचे बारा वर्षे संचालक होते. त्यांनी कुकडी कारखाना व बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. राहूल जगताप यांनी आमदार व्हावे व जिल्हा बँकेत जावे या त्यांच्या दोन्ही इच्छा आता पुर्ण झाल्या आहेत.
दरम्यान जगताप हे बिनविरोध बँकेत जात असल्याने आमदार पाचपुते गटाला मोठा धक्का बसला असतानाच अनुराधा नागवडे याही बिनविरोध झाल्याने तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांच्या हाती येते की काय अशी शंका भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.  

भाजपपुढे अडचणी वाढणार

जगताप यांनी बँकेत प्रखर विरोधानंतरही बँकेत अशा रितीने जात त्यांची राजकीय परिपक्वता सिध्द केल्याचे बोलले जाते.
वडील कुंडलिकराव तात्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या राहूल जगताप यांच्यानंतर सासरे शिवाजीराव बापु नागवडे यांचेही  स्वप्नही साकार करण्याचा मान अनुराधा नागवडे यांनी मिळविला. या दोन दिवंगत नेत्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेल्या राहूल जगताप व अनुराधा नागवडे यांच्या या निवडी भविष्यात भारतीय जनता पक्षासाठी मात्र अडचणीच्या ठरणार आहेत.

तात्यांची जागा काकांनी घेतली

'तात्यां'च्या वडिलकीची  जागा घेतली 'काकां'नी
राहूल यांचे वडील कुंडलिकराव जगताप यांनी मुलाने जिल्ह्याच्या राजकारणात जावे असे वाटत होते. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर राहूल ही पहिलीच निवडणूक लढवित होते. त्यात त्यांना कुठलाही धोका होवू नये यासाठी आमदार अरुण जगताप यांनी जातीने लक्ष दिले. ते बिनविरोध होईपर्यंत त्यांनी लावलेली फिल्डींग विरोधक भेदू शकले नाहीत. 

loading image