
संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील मनोली या छोटेखानी गावात राहणाऱ्या पराड या अत्यल्पभूधारक, मोलमजूरी करणारे कुटूंब वास्तव्यास आहे.
संगमनेर (अहमदनगर) : आजोबा, बाप आणि मुलगा अशा तिन पिढ्यांनी ग्रामपंचायतीचा शिपाई म्हणून गावाची प्रामाणिक सेवा केली. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलाने ते काम करण्याची परंपरा तीन पिढ्यांनी जोपासली. त्यातील अशोक पराड यांना सेवानिवृत्तीनंतर गावाचा सरपंच म्हणून काम करण्याचा सन्मान आरक्षणामुळे मिळाल्याने, संगमनेर तालुक्यातील मनोली गावात एक नवीन इतिहास घडू पाहत आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील मनोली या छोटेखानी गावात राहणाऱ्या पराड या अत्यल्पभूधारक, मोलमजूरी करणारे कुटूंब वास्तव्यास आहे. या कुटूंबातील भागाजी पराड यांनी मनोली-रहिमपूर-ओझर या ग्रुप ग्रामपंचायत स्थापनेपासून ते 1987 सालापर्यंत 45 वर्ष ग्रामपंचायतीचे शिपाई म्हणून कर्तव्य बजावताना प्रामाणिकपणे गावाची सेवा केली. त्यांच्या निवृत्तीनंतर दहावीपर्यंत शिक्षण झालेला त्यांचा मुलगा अशोक पराड याने शिपाई व नंतरच्या काळात क्लर्क म्हणून 27 वर्ष सेवा केली.
शिर्डी बंदचा निर्णय मागे, विखे पाटलांची मध्यस्थी आली कामी
त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा शैलेश सध्या सात वर्षांपासून ग्रामपंचायतीचा शिपाई म्हणून काम पाहत आहे. दैवाचा खेळ विचित्र असतो. या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतअशोक पराड यांनी राजकिय पटलावर आपल्या दैवाचे फासे टाकले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील या गावात परंपरागत विरोधक असलेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दोन गटात लढत झाली. त्यात 11 पैकी 9 जागांवर विखेंच्या जनसेवा पॅनलने बाजी मारली.
अण्णांच्या इशाऱ्यानंतर मोदी सरकार घाबरले, दिल्लीत सुरू झाल्या बैठकांवर बैठका
बुधवार (ता. 27) रोजी तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले. मनोली गावासाठी सरपंचपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, या जागेवर गावातील प्रभाग 4 मधून विजयी झालेले एकमेव उमेदवार म्हणून अशोक पराड यांची वर्णी लागली आहे. दैवगतीमुळे शिपाई म्हणून पिढ्यानपिढ्या राबलेल्या या कुटूंबाला सरपंचपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे मनोलीत बाप सरपंच त मुलगा शिपाई असे दृष्य बघायला मिळणार आहे. शिपाई ते सरपंच या प्रवासात गावाची खडानखडा माहिती व कारभाराची जाणीव असल्याने, पराड यांच्या प्रामाणिक कष्टाचे या निमित्ताने चिज झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मतदारांना दाखवलेल्या विश्वासाला तडा जावू न देता, सर्वांच्या सहकार्याने कारभार करणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या गावासाठी असलेल्या योजनांची अमंलबजावणी व गावातील सर्व घटकांसाठी घरकुल योजना व सर्व पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्याला प्राधान्य राहील.
- अशोक पराड, सरपंचपदाचे उमेदवार, मनोली