विजेचा लपंडाव थांबणार... दिवसा वीज मिळणार 

Attempt to supply electricity to farmers during the day
Attempt to supply electricity to farmers during the day

राहुरी : कृषीविषयक नवीन ऊर्जा धोरण ठरविताना सौरऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याचे ठरविले आहे. ज्या वीज उपकेंद्रातून शेतीला जास्त वीजपुरवठा होतो, अशा उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या आत शासकीय जमिनीत महावितरणतर्फे दोन ते दहा मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प उभारून, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज राहुरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

तनपुरे म्हणाले, ""बिबट्या, साप व इतर हिंस्र श्वापदांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांची दिवसा वीजपुरवठ्याची मागणी आहे. त्यासाठी नवीन कृषीविषयक ऊर्जा धोरण ठरविताना बदल सुचविले आहेत. त्यात सौरऊर्जा प्रकल्पांना चालना देणार आहे. नगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी येथे तसा सौरऊर्जा प्रकल्प झाला आहे. इतर दोन ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे. शासनाने ईईएसएल कंपनीबरोबर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे करार केले आहेत. त्यात सहाशे मेगावॉट प्रकल्पाचे काम अद्याप बाकी आहे.'' 

नगर येथे आज महसूल, वन खाते, जिल्हा परिषद, महावितरण व ईईएसएल कंपनी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. नगर जिल्ह्यात दोन ते दहा मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला चालना देण्यासाठी शासकीय जमिनींचा शोध घेण्याचे सांगितले आहे. सर्व वीज उपकेंद्रांची पाहणी करून, सौरऊर्जेचा प्रस्ताव युद्धपातळीवर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून, सौरऊर्जा प्रकल्प उभारलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्‍य होईल. 
मुंबई येथे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत बैठक घेतली. त्यात राहुरी लघुऔद्योगिक वसाहतीच्या विकासावर चर्चा केली. येत्या आठवडाभरात पथक येणार असून, औद्योगिक वसाहतीची सक्षमता तपासणार आहे. राहुरी औद्योगिक वसाहतीचा विकास करून, तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

लॉकडाउन काळात उन्हाळ्यामुळे व सर्व जण घरात असल्याने तीन महिन्यांचे वीजबिल वाढले आहे. एक एप्रिलनंतर वीजबिलात पाच टक्के दरवाढ झाली आहे. युनिट दराच्या स्लॅबची सवलत देऊन, घरगुती ग्राहकांना वीजबिले दिली आहेत. तीन टप्प्यांत बिले भरण्याची सवलत आहे. ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले. अहमदनगर.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com