नगरसेवक गंधाडे म्हणतात आम्हीच गेलो...अौटींना काहीच करता आलं नाही

Auti did not solve Parner's water problem
Auti did not solve Parner's water problem

पारनेर  : मी या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (कै) वसंतराव झावरे यांच्याच बरोबर काम करत होतो. मात्र, विजय औटी आमदार झाल्यानंतर पारनेर शहरातील व माझ्या गावातील माणूस आमदार झाला आहे. ते शहराचा विकास करून शहराचा पाणीप्रश्न सोडवतील.

या अाशेने मी त्यांच्याबरोबर सेनेत गेलो. मी त्यांच्याकडून कुठल्याही पदाची अपेक्षा कधी केली नाही. मात्र, गेल्या 15 वर्षात सत्ता असतानाही पाणी प्रश्न सुटला नाही. अाता आमदार नीलेश लंके यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याबरोबरच  शहराच्या विकासाचा शब्द दिला आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

मी या पूर्वीही कोणत्याही पदाची कधीच अपेक्षा केली नाही. मला शहराचा पाणी प्रश्न महत्वाचा वाटतो. तो सुटणे गरजेचे आहे. पारनेर नगर पंचायतीबरोबर कर्जत, जामखेड, नेवासा या नगरपंचायतींनी आपले पाणी प्रश्न सोडविले आहेत. मात्र, पारनेरचा पाणी प्रश्न अद्यापही सुटला नाही. मी ग्रामपंचायत असतानाही औटी यांच्याच बरोबर काम करत होतो. नगरपंचायत झाल्यानंतरही त्याच्या बरोबर होतो.  मात्र, गेली अनेक वर्षात हा पर्सऩ सुटला नाही, याच वेदनेतून मी शिवसेना सोडली.

आमदार लंके हे तरूण आहेत. त्यांचा कामाचा अवाका मोठा आहे. ते पाणी प्रश्न सोडविल्याशिवाय राहाणार नाहीत. तसा शब्द्ही त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच दिला आहे. मी पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो. अाता पुन्हा आल्याने समाधान वाटले. 

मला भविष्यात नगरपंचायतीची उमेदवारी मिळो अगर न मिळो फक्त शहराचा पाणी प्रश्न सुटावा हीच अपेक्षा आहे. मी कुठल्याही कामाची अपेक्षा या पुर्वी ठेवली नव्हती माझ्यावर कुठलाही आरोप नाही. सध्या शहराचा विकास थांबला आहे नेहमी मर्जीतील लोकांनाच कामे देणे जवळच्या कार्यकर्त्यांना किंमत न देणे या मुळे आम्ही बाजूला झालो आहोत.

पारनेर शहरासाठी 110 कोटीची योजना आराखडा तयार होता. ते विधानसभेचे उपसभापती झाल्यानंतर त्यांना तो सहज सोडविता आला असता. मात्र आमचा अपेक्षेचा भंग झाल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असेही देशमुख म्हणाले.

आम्ही गेली अनेक वर्ष माजी आमदार विजय औटी यांच्या बरोबर कोणत्याही पदाची अगर आर्थिक अपेक्षा न ठेवता एकनिष्ठेने काम केले. त्यांनी आम्हाला पाठबळ दिले नाही. आमची शिवसेनेत नेहमीच घुसमट होत होती. त्यामुळे शेवटी आम्हाला हा निर्णय़ घ्यावा लागला.

-किसन गंधाडे, नगरसेवक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com