Balasaheb Thorat:धमक्या देऊन आमचं पाऊल रोखता येणार नाही : माजी मंत्री बाळासाहेब थोरात; कीर्तनकार संग्रामबापू भंडारेंच्या निषेधार्थ रॅली
Maharashtra Politics: कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी थोरात यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरात गुरुवारी (ता.२१) सकाळी ऐतिहासिक सद्भावना रॅली काढण्यात आली. ही रॅली नवीननगर रोडवरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनासमोर आली आणि तेथे सभेत तिचे रूपांतर झाले.
संगमनेर: मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. त्यामुळे कधीही मरायला तयार आहे. पण मागे हटणारा नाही. भीती दाखवून, धमक्या देऊन आमचं पाऊल रोखता येणार नाही, अशा ठाम शब्दांत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका जाहीर केली.