esakal | शरद पवारांच्या टिकेला बाळासाहेब थोरातांचे संयमी प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb-thorat

शरद पवारांच्या टिकेला बाळासाहेब थोरातांचे संयमी प्रत्युत्तर

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : काँग्रेस (Congress) ही राज्यघटनेच्या मूलभुत तत्वांशी निगडीत विचारधारा आहे. राज्यघटनेचे मूलभुत प्रश्न हा आमचा विचार आहे. आज कदाचित त्या विचारधारेला कठीण परिस्थिती आली असेल, मात्र काँग्रेसपक्ष निश्चित पुन्हा उभारी घेईल असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

काँग्रेसची आजची अवस्था हवेली मोडकळीला आलेल्या जमीनदारासारखी झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केल्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र त्यांच्या स्वभावाला साजेशी संयमी प्रतिक्रीया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

ही विचारधारेची लढाई : महसूलमंत्री थोरात

शरद पवार यांनी आघाडी सरकारमध्ये सामिल असताना केलेले हे वक्तव्य योग्य आहे का याबाबत बोलताना ते म्हणाले, पवार यांनी ती मांडणी त्यांच्या पद्धतीने केली आहे. तरी विचारधारेवर आलेल्या व्हायरसमुळे काँग्रेस कमी दिसते आहे हे सगळ्यांनी ओळखले पाहिजे. लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी हा व्हायरस काढून टाकण्याची जबाबदारी केवळ काँग्रेसची नाही तर, प्रत्येक नागरिकाची आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, त्याबाबत मी काही बोलू इच्छित नाही. ही विचारधारेची लढाई आहे. आपला देश कशा पद्धतीने चालवायचा तसेच लोकशाही व राज्यघटना जपण्याची आमची लढाई शेवटपर्यंत सुरू राहील. आम्ही हार मानणार नाही.

हेही वाचा: शांतताप्रिय तंटामुक्त गावातच राडा! 20 जणांवर गुन्हा

''एक धर्मांध, जातीयवादाचा व्हायरस आज देशात घुसलेला दिसतोय, म्हणून आम्ही कठीण परिस्थितीत दिसत असू. मात्र एक दिवस काँग्रेस उभारी घेईल, आमची विचारधारा उभारी येईल त्याबाबत कोणीही शंका बाळगू नये.'' - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

हेही वाचा: संगमनेर: जिल्ह्यात घुलेवाडी लसीकरणात अग्रस्थानी

loading image
go to top