परप्रांतीयांची टोळी नगरमधून हद्दपार, राजूरमध्ये माजवली होती दहशत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

दारूबंदीचे कार्यकर्ते हेरम्ब कुलकर्णी यांनी हा निर्णय म्हणजे ऐतिसिक अाहे. इतर अवैद्य विक्रेत्यांना त्यामुळे चपराक बसेल

नगर : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व दारूबंदीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजूर गावात परप्रांतीय मजूर म्हणून आलेले शिरजोर झाले आहेत मजुरी करण्यापेक्षा दारूबंदी असताना अवैध्यरित्या दारू, गांजा व्यवसाय करून गावाला वेठीस धरून प्रसंगी पोलिसांवरही हात उचलणाऱ्या संजय शुक्ला गॅंगला राजूर पोलिसांनी तडिपार केले. 

कर्तव्यदक्ष अधिकारी नितीन पाटील यांनी तालुक्यात संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या संजय अदालतनाथ शुक्ला (३०), राहुल अदालतनाथ शुक्ला (२५), विनय अदालतनाथ शुक्ला (२३, मूळचे उत्तरप्रदेश आता सर्व राजूर) यांच्यावर हद्दपारीची कारवाई व्हावी म्हणून जिल्हा पोलिसांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावर कारवाई करीत या तिघांच्या टोळीला २ वर्षांसाठी नगर जिल्ह्यासह बाजूच्या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती सपोनि नितीन पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा - त्यांना आम्ही मुख्यमंत्र्याच्या पाया पडताना पाहिलंय, थोरातांचा विखे पाटलांवर पलटवार

दारूबंदीचे कार्यकर्ते हेरम्ब कुलकर्णी यांनी हा निर्णय म्हणजे ऐतिसिक अाहे. इतर अवैद्य विक्रेत्यांना त्यामुळे चपराक बसेल. राजूर येथे ४० वर्षांपूर्वी  अदालतनाथ शुक्ला आपल्या पत्नीसह उत्तरप्रदेशमधून आला. प्रथम पेढे विक्रीनंतर होळीचे कडे गाठी विक्री करून गुजराण करीत असे. मात्र त्याने मुले मोठी झाल्यावर गांजा, नंतर दारू विक्री सुरु केली.

त्याचा मोठा मुलगा संजय याने राजूर परिसरात राजरोस अवैध्य व्यवसाय सुरु केले. पोलिसांना हाताशी धरून लोकांवर केस करण्याची दमबाजी करीत गँगची दहशत निर्माण केली होती.

राजूर येथे दारू बंदी असतानाही तो सार्वजनिक ठिकाणी दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता. काही पोलीस कर्मचारीही त्याच्या या कामात सहभागी असल्याचे समोर आले आहे. टोळीप्रमुख संजय अदालतनाथ शुक्ला (वय ३०), राहुल अदालतनाथ शुक्ला (वय २५), विनय
अदालतनाथ शुक्ला (वय २३) यांचा तडिपार केलेल्यामध्ये समावेश आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bandits were expelled from Akole