रेड पडताच बीडीओने गिळल्या लाचेतील नोटा... सुरू आहे सोनोग्राफी

BDO caught Red throwing
BDO caught Red throwing

अकोले :तालुक्यात पंचायत समितीत गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे. काही पदाधिकाऱ्यांचा तेथे भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आहे. त्यात अधिकारीही अडकल्याचे म्हणणे होते. पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही असे त्यांचे म्हणणे होते. ते आज खरे ठरले. कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यानेच  लाच घेतल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

 तालुक्याचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्यावर नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. एका ठेकेदाराकडून म्हाळुंगी येथील दलित वस्तीसुधार कामाच्या बिलाच्या मोबदल्यात आर्थिक मागणी केली होती. 

गुरुवारी १६ जुलै रोजी दुपारी २ वाजता ती रक्कम स्वीकारत असताना छापा टाकून रंगेहाथ पकडले. मात्र, यावेळी रेंगडे यांनी नोटा गिळल्या. त्यामुळे पथकातील अधिकाऱ्याने त्याची एका खाजगी ठिकाणी नेऊन सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. 

या बाबतचे वृत्त असे की, अकोले तालुक्याचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यात परिचित होते. मात्र, काही ग्रामसेवक, ठेकेदार व पुढारी दुखविल्याने त्याच्या अडचणीत भर पडली होती. त्यातच आज नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रेंगडे व अजून एकास ताब्यात घेतले. अकोले पोलीस स्टेशनला नोंद ,गुन्हा नोंदविणे व मेडिकल  करण्यासाठी अधिकारी यांची धावपळ सुरु होती.

या बाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. सोनोग्राफीचा रिपोर्ट आला आहे. मात्र, त्याबाबत प्रशासन काहीच बोलायला तयार नाही.त्यामुळे या ट्रॅपविषयी चर्चा सुरू आहे.

मला या प्रकरणात काही कर्मचारी, ठेकेदार व पुढारी यांनी गुंतवले आहे. मी या प्रकरणी निर्दोष आहे. मला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. मी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे मला हा त्रास होत आहे.

भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी, अकोले, अहमदनगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com