अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ परिसर पर्यटकांना खुणावतायेत पण... 

Bhandardara Kalsubai and Harischandragad areas in Ahmednagar district closed for tourists
Bhandardara Kalsubai and Harischandragad areas in Ahmednagar district closed for tourists

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत तर ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे ही सीमारेषेवर असणारे जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने भंडारदरा, कळसूबाई, हरिसचंद्रगड, घाटघर परिसरात पर्यटक येण्यास बंदी असल्याने या भागातील पर्यटन व्यवसायवर गुजराण करणारे लोक बेरोजगार झाले आहेत.
आत्तापर्यंत जंगल, शेती, मजुरी, मासेमारी नियोजन असलेल्या या भागातील कष्टकऱ्यांना अलीकडे पर्यटनातून थोडाफार उदरनिर्वाह मिळायचा. पावसाळी पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यातून रोजगार मिळतो. त्यामुळे वर्षाऋतुमध्ये येथील पर्यटनस्थळ फुल असल्याने रोजंदारी मिळवण्यासाठी धावपळ असायची. यंदाच्या वर्षी मात्र त्याला अपवाद ठरणार आहे. कारखाने व इतर उद्योग अज्ञात असलेल्या भागात थोडीफार शेती आणि जोड असलेल्या पर्यटन व्यवसाय अडचणीत आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
धबधब्यांवर नो एंट्री

रंधा, भंडारदरा, वाकी, मुतखेल, रतनवाडी कॉल टेंबा, साम्रद, घाटघर पांजरे, उडदवणे, मुरशेत, पेंड शेत, बारी, कळसुबाई शिखर आदी निसर्गरम्य पर्यटनस्थळ हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगेवर पर्यटकांना येण्याची परवानगी नाही. पावसाळ्याच्या दोन अडीच महिन्याच्या कालावधीत जवळपास लाखभर पर्यटक येथे येतात. त्यातून हजारो कुटुंबांना रोजगार मिळतो. रिसॉर्टपासून छोट्या हॉटेलपर्यंतच्या व्यवसाय पर्यटकांच्या भरोवशावर चालतात. अलीकडे तंबू, ट्रेडमध्ये राहण्याची सोय निर्माण झाल्याने त्यातून व्यवसाय सुरू झाला आहे. मात्र सध्या हा परिसर रेड झोन शेजारी असल्याने पर्यटकांना तिथे प्रवेश नाही. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नगर येथून दरवर्षी पर्यटक येतात.
त्यांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी खाजगी जीप आणि वाहने उपलब्ध असतात. त्यामुळे खाजगी वाहतूक करणाऱ्या तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र यावर्षी पर्यटक नसल्याने हे तरुण बेरोजगार झाले आहेत. 

कळसुबाई अभयारण्यचे वनपरिक्षेत्राधिकारी दत्तात्रय पडवळ म्हणाले, अभयारण्य परिसरात पर्यटकांना निसर्गप्रेमींना येण्यास बंदी करण्यात आली असून कृपया या परिसरात व धबधब्याजवळ कुणीही फिरकू नये, अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येईल. कोरोनामूळे अकोले तालुक्यात पर्यटनस्थळी तसेच धबधबे धरण परिसरात पर्यटकांनी येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. भंडारदरा परिसरात असलेल्या रिसॉर्टमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना थांबू देऊ नये अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com