Bharat Band Updates : अकोले शहरात कडकडीत बंद

शांताराम काळे
Tuesday, 8 December 2020

अकोले शहरात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला.

अकोले (अहमदनगर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज अकोले शहरात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. मात्र ग्रामीण भागात समिश्रा प्रतिसाद मिळाला राजूर येथे दहानंतर व्यवहार सुरू झाले.

हेही वाचा : भारत बंद : नगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कशी स्थिती वाचा एकाच क्लिकवर
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे पारित केले आहेत. या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अकोले बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अकोले शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांच्या लढ्याला आपला पाठींबा दर्शविला.

सकाळपासून एका ही व्यापाऱ्याने आपले दुकान उघडले नाही. तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात एकत्र जमून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला.

हा बंद यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, कॉ. कारभारी उगले, अगस्तीचे माजी संचालक बाळासाहेब नाईकवाडी, विनय सावंत, विलास नवले, दत्ता नवले, शांताराम सांगारे, दादा पाटील वाकचौरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल नाईकवाडी, आरिफ तांबोळी, नितीन नाईकवाडी, गणेश कानवडे आदींनी परिश्रम घेतले.

अकोले तालुक्यातील राजूर, कोटुळ, कळस बुद्रुक, कळस खुर्द व तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांनी  बंद पाळला. अकोले तहसीलदार, पोलिस यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Band Updates Strictly band in Akole city