

BJP Leader Arrested After Dancer Found Dead in Ahilyanagar
Esakal
जामखेड, ता. ५ : नृत्यांगनेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून संदीप सुरेश गायकवाड याच्यावर शुक्रवारी (ता.५) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गायकवाड यास पोलिसांनी अटक केली आहे. संदीप गायकवाड हा भाजपचा माजी नगरसेवक असून तो नर्तिका दिपाली पाटील हिच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होता. त्यातून दोघांमध्ये वादही होत होते. संदीप गायकवाडच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप नर्तिका दिपालीच्या आईने केलाय.