Financial Scamsakal
अहिल्यानगर
Ahilyanagar Fraud: 'व्यावसायिकाची कर्जाच्या आमिषाने फसवणूक'; व्यावसायिकाला ४० लाखांचा गंडा, २० कोटीचा आमिष नडला
Loan Fraud: काही दिवसांनी प्रोसेसिंग फी म्हणून २० लाख रुपये रोख दिले. नंतर सर्वजण विमानाने गुजरात येथे गेले. तेथे अपना भारत नावाच्या फायनान्स कंपनी ऑफिसमध्ये त्यांना गणेश शिंदे याने अनुराग पटेल याची भेट घालून दिली. तेथे पटेल याने २० कोटींच्या रकमेचा विमा उतरविण्यासाठी आणखी १० लाख रुपये मागितले.
अहिल्यानगर: गुजरातमधील अपना भारत या प्रायव्हेट फंडिंग कंपनीकडून हवालामार्फत २० कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने नगरमधील हॉटेल व्यावसायिकाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल रमेश भांबरे (वय ३३, रा. रुईछत्तीसी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.