esakal | राहुरी : प्रवरेच्या अधिकाऱ्यास काळे फासल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Case Filed

प्रवरेच्या अधिकाऱ्यास काळे फासल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : प्रवरा साखर कारखान्याच्या एका अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी तनपुरे साखर कारखान्याच्या आंदोलक कामगारांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी फॅक्टरी येथे तनपुरे साखर कारखान्याचे दोनशे कामगार मागील पाच वर्षातील थकित वेतन व इतर २५ कोटी ३६ लाखांच्या मागणीसाठी बारा दिवसांपासून उपोषण व धरणे आंदोलन करीत आहेत. बुधवारी (ता. १) आंदोलक कामगारांनी प्रवरा कारखान्याच्या कामगारांना कारखान्यात व संलग्न संस्थेमध्ये कामावर येऊ नये. अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल. असा इशारा दिला होता. परंतु, काल गुरुवारी (ता. २) प्रवरा कारखान्याच्या अकाऊंट विभागातील अधिकारी अविनाश खर्डे विवेकानंद नर्सिंग होम येथे कामावर आले त्यामुळे संतप्त कामगारांनी त्यांच्या चेहऱ्याला काळे फासले.

हेही वाचा: आमदाराचा लाजीरवाणा रेल्वे प्रवास; सहप्रवाशालाही शिवीगाळ

याप्रकरणी खर्डे यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हंटले की, गुरुवारी (ता. २) दुपारी पावणे बारा ते साडेबारा दरम्यान नर्सिंग होमच्या प्रांगणात असतांना तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी एकत्रित येऊन "तू जर इथे आला. तर तुझे हात-पाय कापून मारून टाकू." अशी धमकी देऊन, आरोपींनी माझ्या अंगाला काहीतरी काळे लावून नुकसान केले. जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तनपुरे साखर कारखान्याचे आंदोलक कामगार इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे आदिंसह इतर कामगारांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ करीत आहेत.

हेही वाचा: तनपुरे कारखाना कामगारांनी फासले प्रवरेच्या कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळे

loading image
go to top