esakal | संगमनेर : हुंड्यासाठी शारिरीक व मानसिक छळ प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

A case has been registered against four persons for physically and mentally abusing the newlyweds at Sangamner}

या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या मंडळींवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संगमनेर : हुंड्यासाठी शारिरीक व मानसिक छळ प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल
sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : कोरोना काळात लग्न झाल्याने लग्नाचे वाचलेले दोन लाख रुपये व्यवसायासाठी आणण्याची मागणी करीत, नवविवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला. या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या मंडळींवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

याबाबत साक्षी ज्ञानेश्वर बनसोड, ( वय 19 ) रा. इंदिरानगर, संगमनेर हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, तिचे वडील कुटूंबापासून 12 वर्षांपासून विभक्त राहतात. मध्यंतरी आई स्वाती अनिल मुंडलिक रा. इंदिरानगर हिने 14 जून 2020 रोजी तिचे लग्न श्रीरामपूर येथील नरहरी महाराज मंदिरात वैजापूर येथील ज्ञानेश्वर श्रीराम बनसोड यांच्यासोबत झाले.

सावधान ! लग्नासाठी नवा नियम; पाळला नाहीत तर होणार कारवाई

सासरी नांदताना, लग्न चांगले करु न दिल्याने वाचलेले दोन लाख रुपये व्यवसायासाठी आणण्याचा तगादा साक्षीकडे लावला. या मागणीसाठी तिला उपाशी पोटी ठेवून मारहाण करीत शारिरीक व मानसिक छळ केला. तिला हुंड्यासाठी घराबाहेर काढून दिल्याने, ती एक महिन्यापासून पुन्हा माहेरी आली आहे. तसेच नवरा ज्ञानेश्वर याने दोन लाख रुपये न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

साक्षी बनसोड यांच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पती ज्ञानेश्वर बनसोड, सासू सुरेखा बनसोड, सासरा श्रीराम बनसोड व दीर रोहीत बनसोड ( सर्व राहणार वैजापूर ) यांच्याविरोधात शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.