esakal | अॅम्ब्युलन्सला प्रतिकिलोमीटर एवढेच भाडे द्या

बोलून बातमी शोधा

ambulance
अॅम्ब्युलन्सला प्रतिकिलोमीटर एवढंच भाडं द्या
sakal_logo
By
टीम ई सकाळ

राहुरी : कोरोना संकटात रुग्णवाहिका, शववाहिका दिवस-रात्र धावत आहेत. रुग्णांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने सेवा बजावत आहेत. कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णवाहिकाचालक देवदूत भासत आहेत. मात्र, अपवादात्मक काही खासगी रुग्णवाहिकाचालक अडवणूक करून अतिरिक्त शुल्क आकारून अडवून करतात. सामान्य, गरीब रुग्णांचे नातेवाईकांकडून तशा तक्रारी होऊ लागल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही, असे कुटुंब नशीबवान समजले जात आहे. घरोघरी कोरोनाबाधित झाले. अवाढव्य वैद्यकीय खर्चाच्या भीतीपोटी गरीब अनेक रुग्ण तपासणीकडे पाठ फिरवून घरगुती उपाय करतात. त्रास वाढल्यावर रुग्णालय, ऑक्‍सिजन बेड, रुग्णवाहिकांची शोधाशोध सुरू होते. या परिस्थितीचा काही खासगी रुग्णवाहिकाचालक गैरफायदा घेऊ लागले आहेत.

देवळाली प्रवरा येथे दोन दिवसांपूर्वी गरीब कुटुंबातील एका कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. ऑक्‍सिजन पातळी 65, एचआरसीटी स्कोअर 23 झाला. औरंगाबाद येथे एका रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाले; परंतु रुग्णाला हलवायला रुग्णवाहिका मिळेना. राहुरीतील खासगी रुग्णवाहिका बोलाविली. चालकाने रुग्णालयात पोचल्यावर शंभर किलोमीटरचे चौदा हजार रुपये भाडे मागितले. "अगोदर भाडे, नंतर रुग्णाला उतरून देऊ,' असा पवित्रा घेतला. रुग्णाचे आई-वडील हतबल झाले. दहा हजार रुपयांवर तडजोड झाली. बिल नाही. शासकीय दर माहिती नाही. मानसिक तणावाखाली लुबाडणूक होत आहे.

हेही वाचा: कोरोनावर चिकन, मटण नि अंड्याचा फंडा

शासकीय दरपत्रक असे :

रुग्णवाहिका प्रकार व 25 किलोमीटर (दोन तास)

मारुती व्हॅन ः 700 (14 रूपये प्रतिकिलोमीटर),

टाटा सुमो, मेटॅडोअरसदृश बांधणीची वाहने ः 840 (14 रूपये प्रतिकिलोमीटर),

टाटा 407, स्वराज माझ्दा यांच्या साट्यावर बांधणीची वाहने ः 980 (20 रूपये प्रतिकिलोमीटर)

आयसीयू / वातानुकूलित वाहने ः 1190 (24 रूपये प्रतिकिलोमीटर)

जादा भाडे आकारल्यास कारवाई

"रुग्णवाहिकांचे दरपत्रक निश्‍चित केले आहे. शासनाचे दरपत्रक रुग्णवाहिकांच्या आतील व बाहेरील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालकांवर बंधनकारक आहे. अतिरिक्त शुल्कआकारणी केल्याची तक्रार आल्यास साथरोग व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई केली जाईल.

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

बातमीदार - विलास कुलकर्णी