

Ahmednagar in Charles Darwin Research How Local Observations Helped Explain Human Emotions Across Different Cultures and Regions
sakal
अहिल्यानगर: इंग्लंडमधील चार्ल्स डार्विन हा प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ होता. त्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे. त्याने मानवजातीच्या व प्राण्यांच्या उत्क्रांतीचे रहस्य उलगडले. त्याच्या या महान कार्यात नगरी माणसांचा वाटा आहे. तो त्याने आपल्या ‘द एक्स्प्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अँड ॲनिमल’ या पुस्तकात नमूद केला आहे. त्यामुळे नगरचे नाव विज्ञानाच्या इतिहासात नोंदवले गेले.