esakal | अहमदनगर : छिंदम बंधूंना अटक; जातीवाचक शिविगाळ प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

chhindam

अहमदनगर : छिंदम बंधूंना अटक; जातीवाचक शिविगाळ प्रकरण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम (chhindam brothers) यांना तोफखाना पोलिसांकडून (tofkhana police) अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.

छिंदम बंधूंना अटक

नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकाला दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार छिंदम व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने त्याचा साथीदारांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल आहे. छिंदम बंधूंसह चारही जणांनी अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. तर याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना मात्र, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा: सोन्यासाठी उत्तराखंडमधून सुप्यात आले अन् १२ लाख गमावून गेले

हेही वाचा: नगर : तहसीलदार देवरेंच्या कारभाराची लाचलुचपत विभागाकडे तक्रार

loading image
go to top