

Angry villagers, especially women, confronting forest officials after the capture of the alleged man-eater leopard in Nagar taluka.
Sakal
नगर तालुका: नगर तालुक्यातील कर्जुनेखारे गावच्या शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला तर दुसरा विहिरीत पडला. दोन्ही बिबट्यांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. यात नेमका नरभक्षक बिबट्या पकडला की दुसरे पकडले यावर स्थानिक ग्रामस्थ व वन विभागामध्ये प्रचंड रणकंदन झाले. या भागातील संतप्त महिलांनी तर विहिरीत पडलेल्या बिबट्याला गोळ्या घाला अशी मागणी करून रुद्रावतार घेतल्याने प्रशासनाची मोठी कोंडी झाली होती. हे प्रकरण थेट जिल्हाधिकाऱ्यापर्यंत गेले. शेवटी वनविभागाने ग्रामस्थांची समजूत घातल्यानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.